
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, पौर्णिमेला आणि आमावस्येला भरपूर मान दिला जातो. आमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही. हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे स्वतःचे महत्त्व आहे. ज्यामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास, पूजा केल्याने कुटुंबात सुख-शांती येते आणि सर्व दुःखे आणि वेदना दूर होतात. धार्मिक दृष्टिकोनातूनही हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. 2025 मध्ये ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा तारीख कधी येत आहे आणि ज्येष्ठ पौर्णिमा व्रत कोणत्या दिवशी पाळले जाईल आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी 10 जून रोजी सकाळी 11:35 वाजता सुरू होईल आणि पौर्णिमा तिथी 11 जून 2025 रोजी दुपारी 1.13 वाजता संपेल. उदयतिथीनुसार, ज्येष्ठा पौर्णिमा बुधवार, 11, 2025 रोजी साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, पौर्णिमेच्या दिवशी दान आणि पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती होण्यास मदत होते.
दर महिन्याला शुक्ल पक्षातील पौर्णिमेला पौर्णिमेचे व्रत केले जाते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या पूर्ण स्वरूपात दिसतो. या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केले जाते. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 6:48 वाजता आहे. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्याने पापांपासून मुक्तता मिळते, पुण्य वाढते, मन शुद्ध होते आणि कुटुंबात सुख आणि समृद्धी येते. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी दानधर्माचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना अन्न आणि कपडे दान करून त्यांची सेवा केली जाते. या दिवशी उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.