Kartiki Ekadashi 2026 : एक कार्तिकी एकादशीचा उपवास अन् हजारो यज्ञांचे पुण्य! जाणून घ्या या व्रताचे धार्मिक महत्त्व

कार्तिकी एकादशीचा उपवास आपण दरवर्षी करतो. दरवर्षी तुळशीचे लग्न लावतो. पण तुम्हाला माहित आहे का? कार्तिकी एकादशीचा उपवास केल्याने काय फळ मिळते. त्यामागे किती मोठी परंपरा आहे.

Kartiki Ekadashi 2026 : एक कार्तिकी एकादशीचा उपवास अन् हजारो यज्ञांचे पुण्य! जाणून घ्या या व्रताचे धार्मिक महत्त्व
KARTIKI EKDASHI
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 20, 2026 | 2:21 PM

वर्षभरात अनेक एकादशी येतात पण कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेक भाविक विठुरायाच्या नावाचा गजर करत उपवास करतात. काहीजण पंढरपूरला जाऊन विठ्ठल – रुक्मिणीचे दर्शन घेतात, तर काहीजण घरीच पूजा आणि भजन कीर्तन करून हा दिवस साजरा करतात. पण तुम्हाला माहित आहे का? कार्तिकी एकादशीचे केल्याने काय पुण्य मिळते. तर हा उपवास केल्याने 1000 हजार अश्वमेध यज्ञ आणि 100 राजसूय यज्ञ केल्याइतके पुण्य मिळते. अशी धार्मिक मान्यता आहे, त्यामुळे या एकादशीला केवळ उपवासाचा दिवस न मानता, भक्ती संयम आणि पुण्यप्राप्तीचा दिवस मानला जातो

कार्तिकी एकादशीच्या उपवासाचे काय फळ मिळते?

धार्मिक मान्यतेनुसार कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा आणि उपवास केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते. पद्मपुराणातील प्रबोधिनी एकादशीच्या महात्म्यात या व्रताचे मोठे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी श्रद्धेने उपवास करणाऱ्या भक्ताला हजारो अश्वमेध यज्ञ आणि शंभर राजसूय यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते, अशी मान्यता आहे.

Loading...

उपवास कसा करावा ?

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू आणि विठ्ठल रुक्मिणीची पूजा करावी. देवाला फुले, तुळशी पत्रे,
फळे आणि नैवेद्य अर्पण करावा ‘ओम नमः ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा आणि शक्य असल्यास सहस्त्रनाम हरिपाठ किंवा भगवद्गीतेचे पठण करावे दिवसभर उपवास करून भजन कीर्तन आणि हरिनामात वेळ घालवावा.

हे व्रत केल्याने पित्रांचा उद्धार होतो

पित्रांच्या उद्धारासाठी कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे नामस्मरण पूजा केली जाते. तसेच भजन करून रात्र जागरण करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भक्तीभावाने जागरण आणि विष्णू कथा श्रवण केल्याने पुण्य मिळते तसेच व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या पितरांचाही उद्धार होतो अशी श्रद्धा आहे.

 

शुभकार्याला सुरूवात 

भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, आणि कार्तिकी एकादशीला चार महिन्यानंतर ते जागे होतात. अशी धार्मिक मान्यता आहे, त्यामुळे या दिवसापासून चातुर्मासाची सांगता होते.
यानंतर विवाह आणि शुभकार्याला सुरूवात होते.

उपवास करताना काही भाविक निर्जळी व्रत करतात. तर काहीजण फळे दूध आणि साबुदाणा राजगिरा यांसारखे फराळाचे पदार्थ खातात दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणा करण्याची परंपरा आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us