AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाकडून स्वबळाचा नारा? पुरंदर बंगल्यावर घडामोडींना वेग, तातडीची बैठक

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. उपसभापती सचिन अहिर यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या पुरंदर बंगल्यामध्ये घडामोडींना वेग आला आहे. बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून, अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाकडून स्वबळाचा नारा? पुरंदर बंगल्यावर घडामोडींना वेग, तातडीची बैठक
महायुतीची महत्त्वाची बैठक Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 2:17 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई बँक निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे. मात्र ही निवडणूक शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार अशा काही बातम्या समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. उपसभापती सचिन अहिर यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या पुरंदर बंगल्यावर महायुतीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला महायुतीमधील प्रमुख नेते उपस्थित आहेत. उपसभापती सचिन अहिर, मंत्री उदय सामंत, भाजप नेते प्रवीण दरेकर, सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे यांची या बैठकीला उपस्थिती आहे. मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवली जावी यावर या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.  दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीमध्ये लढण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

जागा वाटपाचा तीढा कायम

दरम्यान मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीमध्ये लढण्यावर जरी शिक्कामोर्तब झालं असलं तरी देखील जागा वाटपाचा तीढा अद्याप कायम आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागा वाटपावर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.  डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही निवडणूक होणार आहे.

सातारा जिल्हा बँकेत भाजपला धक्का 

दरम्यान दुसरीकडे सातारा जिल्हा बँकेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. बँकेत सर्वाधिक सदस्य असताना सुद्धा मंत्री शंभुराज देसाई यांच्या एका खेळीमुळे भाजपची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची संधी हुकली आहे. सातारा जिल्हा बँकेत एकून सदस्यांची संंख्या 21 इतकी आहे. बहुमतासाठी 12 मतांची आवश्यकता होती. भाजपकडे सर्वाधिक 9 सदस्य संख्या होती. शिवसेना शिंदे गटाकडे चार तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 8 सदस्य होते. 12 सदस्यांची आवश्यकता असल्याने शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेना शिंदे गटाचे चार अशी सदस्य संख्या जुळवल्याने या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अध्यक्ष तर शिवसेना शिंदे गटाचा उपाध्यक्ष झाला.  या निवडणुकीत भाजपची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची संधी हुकली.

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर