AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांचं धक्कातंत्र, बोल्ड निर्णय घेत प्रस्थापितांना धक्का, ठाण्यातच…

एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीत धक्कातंत्र वापरत प्रस्थापितांना धक्का दिला आहे. अनेक जुन्या व मातब्बर नगरसेवकांना डावलून त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. या बोल्ड निर्णयामुळे ठाण्यात राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. कोण होणार स्थायी समिती सभापती, याकडे आता लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांचं धक्कातंत्र, बोल्ड निर्णय घेत प्रस्थापितांना धक्का, ठाण्यातच...
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 2:09 PM
Share

शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. शिंदे कधी आणि कोणता धक्का देऊन सर्वांना बुचकाळ्यात टाकतील याचा नेम नसतो. त्यामुळेच शिंदे यांच्या प्रत्येक चालींकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असते. परकीयांसोबतच नव्हे तर स्वकियांसोबतही शिंदेंनी धक्कातंत्र वापरल्याचं यापूर्वी पाहायाला मिळालं आहे. आता ठाण्यातील स्वपक्षातील नगरसेवकांनाही याचा आज प्रत्यय आला आहे. ज्या नगरसेवकांची नावे स्थायी समितीच्या सदस्यपदांसाठी चर्चेत होती. त्या सर्वांना धक्का देणारा अत्यंत बोल्ड निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून ठाण्यात सध्या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे महापालिकेत स्थायी समितीवर काही सदस्यांची नियुक्ती करायची होती. त्यासाठी काही जुने आणि मातब्बर नगरसेवकांची नावे चर्चेत होती. या नगरसेवकांनी स्थायी समितीवर जाता यावं म्हणून मोठा जॅकही लावला होता. लॉबिंगही सुरू केली होती. पण शिंदे यांच्या एका निर्णयापुढे कुणाचीच डाळ शिजली नाही. शिंदे यांनी या सर्वांना धक्का बसला आहे. सुधीर कोकाटे, विकास रेपाळे, राम रेपाळे, योगेश जानकर, रमाकांत मढवी, विमल भोईर, संजय भोईर आदींची नावे स्थायी समिती सदस्यपदासाठी चर्चेत होती. पण त्यांना पहिल्या वर्षी संधी नाकारण्यात आली आहे. यापैकी अनेकजण तर स्थायी समिती सभापती पदाच्या शर्यतीत होते. तर पूर्णेकर प्रकरणामुळे मीनाक्षी शिंदे यांना देखील संधी नाकारल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संधी कुणाला?

एकनाथ शिंदे यांनी दिलीप बारटक्के, राजेश मोरे, पवन कदम, बाबाजी पाटील, संध्या मोरे, प्रमिला केणी, आदेश भगत, विक्रांत तांडेल आणि महेश साळवी आदी सदस्यांना संधी दिली आहे. ज्यांची नावे सदस्यपदासाठी आणि सभापतीपदासाठी चर्चेत नव्हती, त्यांना शिंदे यांनी संधी दिली आहे. आता यापैकी कुणाच्या गळ्यात स्थायी समिती सभापती पदाची माळ पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपकडून कुणाला संधी?

दरम्यान, भाजपने स्थायी समिती सदस्यपदासाठी भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, कमल चौधरी यांची तर शरद पवार गटाने पल्लवी जगताप, यासीन कुरेशी यांची नियुक्ती केली आहे. अजितदादा गटाने सुहास देसाई, एमआयएमने शोएब डोंगरे यांची नियुक्ती केली आहे. स्थायी समितीवर एकूण 16 सदस्यांची नावे करण्यात येणार आहे.

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर