AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला धक्यावर धक्का… मंत्र्याचं अख्ख कुटुंबच पराभूत, पत्नी आणि दोन्ही मुलांना नाकारले

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. नगरविकास मंत्री झाबर सिंह खर्रा यांचे संपूर्ण कुटुंब, पत्नी व दोन्ही मुले पराभूत झाले. सीकर जिल्ह्यात काँग्रेसने दमदार कामगिरी करत बाजी मारली. पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भाजपसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

भाजपला धक्यावर धक्का... मंत्र्याचं अख्ख कुटुंबच पराभूत, पत्नी आणि दोन्ही मुलांना नाकारले
Jhabar Singh KharraImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 1:43 PM
Share

राजस्थानच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे पक्ष पिछाडीवर असतानाच दुसरीकडे पक्षाला मोठे झटके बसताना दिसत आहेत. भाजपचे राजस्थानमधील नगरविकास आणि स्वायत्त शासन (यूडीएच) मंत्री झाबर सिंह खर्रा यांचं संपूर्ण कुटुंबच या निवडणुकीत पराभूत झालं आहे. झाबर सिंह खर्रा यांची पत्नी शांती देवी आणि त्यांची दोन्ही मुले या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे मंत्र्याची पत्नी आणि एक मुलगा भाजपच्या तिकीटावर उभे होते. तर दुसरा मुलगा अपक्ष निवडणूक लढत होता. पण मतदारांनी मंत्र्याच्या कुटुंबीयांना घरचा रस्ता दाखवला आहे.

सीकर जिल्ह्यातील श्रीमाधोपूरमधील पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. श्रीमाधोपूर आणि अजितगड या दोन्ही पंचायत समित्यांवर काँग्रेसने ताबा मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

51 मतांनी पराभव

सीकर जिल्ह्यातील अजितगड पंचायत समितीतील वॉर्ड नंबर 17 मधून यूडीएच मंत्री झाबर सिंह खर्रा यांची पत्नी शांती देवी निवडणुकीला उभी होती. शांती देवी भाजपच्या तिकीटावर लढत होत्या. पण या मतदारसंघात त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यांचा 51 मतांनी पराभव झाला. ही सीट मंत्री खर्रा यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असल्याचं मानलं जात होतं. पण निकाल काही त्यांच्या बाजूने आला नाही.

अपक्ष लढला आणि पडला

मंत्री झाबर सिंह खर्रा यांचा मोठा मुलगा दुर्गा सिंह खर्रा हा श्रीमाधोपूर पंचायत समितीच्या वॉर्ड नंबर 19 मधून अपक्ष निवडणूक लढवत होता. त्यालाही पराभूत व्हावं लागलं आहे. मंत्र्याचा दुसरा मुलगा अजय सिंह खर्रा हा भाजपच्या तिकीटावर लढत होता. तो श्रीमाधोपूर पंचायत समितीच्या वॉर्ड नंबर 20 मधून लढत होता. हा वॉर्ड ग्राम पंचायत कल्याणपुरा थोई क्षेत्रात येतो. या सीटवर काँग्रेसचे भैरूलाल वर्मा विजयी झाले. त्यांनी अजय सिंह खर्रा यांचा 60 मतांनी पराभव केला. भाजपच्या मंत्र्याने या निवडणुकीत घरातील तीन सदस्यांना उतरवलं होतं. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न होता. पण मतदारांनी त्यांच्या प्रयत्नांनाच सुरुंग लावला आहे.

माजी जिल्हाध्यक्षा पराभूत

दरम्यान, सीकर जिल्हा परिषदेच्या वॉर्ड नंबर 48मधून भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षा इंद्रा चौधरी या निवडणूक लढत होत्या. त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. हा पक्षासाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. एकाच जिल्ह्यात मंत्र्यांचं कुटुंब आणि त्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख चेहरा असलेल्या माजी जिल्हाध्यक्षाचा पराभव झाल्याने त्याची चर्चा आता रंगली आहे.

केवळ एका जागेवर विजय

या निवडणुकीत काँग्रेसचं वादळ भाजपला थोपवताना नाकीनऊ आले आहेत. जयपूरच्या झोटवाडा पंचायत निडवणुकीतील निकालाने हे वादळ किती भयंकर होतं हे स्पष्ट केलं आहे. उद्योग मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांचा हा मतदारसंघ आहे. येथील पंचायत समितीच्या 15 जागांपैकी भाजपला केवळ एकच जागा मिळाली आहे. दुसरीकडे, जयपूरच्या सांगानेर पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आले आहेत. या निवडणुकीत 15 पैकी 12 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीला 8 तर काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. आरएलपीने या निवडणुकीत मोठी कामगिरी बजावली आहे.

Follow Us
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...