भाजपला सर्वात मोठा धक्का, पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, काँग्रेसची आगेकूच, बीजेपीला धोबीपछाड
राजस्थान पंचायत समिती निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांनी सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसने 86 जागांवर आघाडी घेत भाजपच्या 32 जागांवरच्या आघाडीला मागे टाकले आहे, जो एक मोठा उलटफेर मानला जात आहे. जिल्हा परिषदेतही चुरस असून, राज्यात सत्तेत असताना भाजपची पिछेहाट झाल्याने हे निकाल महत्त्वपूर्ण ठरले आहेत, ज्यामुळे काँग्रेसची विजयी घोडदौड स्पष्ट झाली आहे.

राजस्थानात भाजपच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. राजस्थान पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकालाची मोजणी सुरू झाली आहे. पंचायत समितीच्या सुरुवातींच्या कलामध्ये मोठा उलटफेर पाहायाला मिळत आहे. या कलांमध्ये 86 जागांवर काँग्रेस आघाडीवर असून भाजपने केवळ 32 जागांची आघाडी घेतली आहे. तर जिल्हा परिषदेच्या चार जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असून एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे. राज्यात सत्ता असतानाही भाजपची पंचायतीच्या निवडणुकीत पिछेहाट होताना दिसत असून भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
राजस्थान पंचायत समितीच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीचे सुरुवातीचे कल आहेत. त्यात भाजप केवळ 32 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने आश्चर्यकाररित्या 86 जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच इतर पक्षांचे तीनजण आघाडीवर आहेत.
बिनविरोध निवड
दरम्यान, राजस्थान पंचायत समितीमध्ये काही सदस्य बिनविरोध विजयी झाली आहेत. यात भाजपचे 19, काँग्रेसचे 11, बसपाचा एक आणि 4 अपक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या संपूर्ण निकालानंतर सरपंच कोण असणार हे स्पष्ट होणार आहे. ज्या पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून येतील त्यांचा सरपंच बसणार आहे.
निवडणुकीचा लेखाजोखा
राज्यात 37 जिल्ह्यांमध्ये 1275 जिल्हा परिषद सदस्य आणि 419 पंचायत समिती सदस्यांसाठी 7543 वॉर्डांमध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पंचायत समितीच्या 7543 वॉर्डात 25108 उमेदवार उभे होते. त्यापैकी 37 वॉर्डातील उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. आता 25,073 उमेदवारांचा निकाल लागणार आहे. या उमेदवारांच्या जय-पराजयचा फैसला आज संध्याकाळपर्यंत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं ल७ लागलं आहे.
निवडणुकीनंतर निवडून येणारे जिल्हा परिषद सदस्य हे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणार आहेत. तर पंचायत समितीचे सदस्य ब्लॉकमध्ये सरपंच आणि उपसरपंच निवडणार आहेत. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या दरम्यान कांटे की टक्कर होत आहे. दरम्यान, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत दबदबा कायम ठेवण्यासाठी भाजपने कंंबर कसली होती. राज्यातील सर्व मंत्री या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. अनेक मतदारसंघात मंत्री ठाण मांडून बसले होते. असं असतानाही मतदारांनी भाजपला नाकारल्याचं चित्र दिसत आहे.
