Dattatray Bharane: अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी दत्ता भरणे यांची मोठी मागणी, म्हणाले अनेकांच्या मनात संभ्रम…
Dattatray Bharane on Ajit Pawar: अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी मोठी मागणी केली आहे. आमदार रोहित पवार यांच्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीतूनही याप्रकरणी प्रतिक्रिया उमटत आहेत. काय केली भरणे यांनी मागणी?

Dattatray Bharane on Ajit Pawar: आमदार रोहित पवार यांनी सोमवारी मफलर मॅनचा बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवून दिली. व्हीएसआर कंपनीच्या मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघात घडून अद्याप साधा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला नसल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी या अपघाताचा तपास लवकरात लवकर करण्यासाठी केंद्राला पत्र लिहिले आहे. दरम्यान आता दादांच्या राष्ट्रवादीतूनही याप्रकरणी प्रतिक्रिया समोर येत आहे. कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी मोठी मागणी केली.
अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य समोर आलं पाहिजे
अजित पवार यांच्या मृत्यूचं सत्य समोर आलं पाहिजे. जसं जसा उशीर लागत आहे तसा अनेकांच्या मनात संभ्रम वाढत चालला आहे, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले. आम्ही पुन्हा एकदा सगळे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटू. त्यांनी सांगितलं आहे की अमित शहा यांना या प्रकरणातील अहवाल लवकर द्यावा, त्यांनी याप्रकरणी तात्काळ अहवाल समोर आणण्याची मागणी केली आहे.
रोहित पवार यांना टोला
कोणी कोणाच्या लग्नात गेलं मफलर घातलं म्हणजे याचा अर्थ असा होत नाही. बारामती विमानतळाला अजित दादा असताना च काम करण्यासाठी चर्चा झाली होती. मात्र दुर्दैवाने दादांच निधन झालं. आता सरकारने निधी मंजूर केला आहे. विमानतळाच काम केलं जाईल. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच नात कस होत हे मी डोळ्याने पाहिलं आहे, असे म्हणते त्यांनी रोहित पवार यांना टोला हाणला.
१० लाख शेतकरी वंचित
राज्यातील शेतकर्यांना आम्ही जास्तीत जास्त मदत करणार आहोत. ५ हजार अग्रीम मदतीमध्ये १० लाख शेतकरी राहिले आहेत, अशी माहिती भरणे यांनी दिली. मात्र त्यांची कागदपत्रं अपूर्ण आहेत, त्याच सोबत काही ठिकाणी सामायिक शेती असेल त्यामुळे ही मदत पोहचली नसल्याचा दावा त्यांनी केला.आम्ही त्यांना पण लवकरात लवकर पूर्ण मदत करू. शेतकऱ्यांच्या सोबत सरकार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
एकाच ठिकाणी मतदान करण्याचे आवाहन
जर कोणी कामाच्या निमित्ताने बाहेर असेल त्याची शेती गावी असेल आणि गावात मतदान असेल तर कमी करू नये. एकच ठिकाणी कुठे तरी मतदान ठेवाव. सगळी प्रक्रिया पारदर्शी झाली पाहिजे. खालच्या स्तरावर कोणी राजकारण करू नये. जे खरं आहे ते खरं आणि खोटं आहे ते खोटं, सगळं पारदर्शी झालं पाहिजे, असे भरणे म्हणाले.
