AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईशा सिंहसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर अविनाश मिश्राने सोडलं मौन; थेट म्हणाला..

ईशा सिंहसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर अभिनेता अविनाश मिश्रा याने मौन सोडलं आहे. 'नातेसंबंध हे खासगी असतात, मनोरंजनाचा विषय नाहीत', अशी पोस्ट करत त्याने मीडिया आणि नेटकऱ्यांना खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे.

ईशा सिंहसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर अविनाश मिश्राने सोडलं मौन; थेट म्हणाला..
अविनाश मिश्रा आणि ईशा सिंहImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 20, 2026 | 1:43 PM
Share

Avinash Mishra Eisha Singh Breakup: ‘बिग बॉस 18’मधून घराघरात लोकप्रिय झालेले टीव्ही कलाकार अविनाश मिश्रा आणि अभिनेत्री ईशा सिंह यांच्या नात्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. मात्र, त्यानंतर लगेचच दोघांमध्ये दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या. सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यापासून ते ईशाच्या आईच्या कथित व्हॉइस नोटपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा रंगली. आता या सर्व चर्चांवर अविनाशने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, ब्रेकअप झाल्याच्या वृत्ताला त्याने दुजोरा दिलेला नाही. उलट, आपल्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका, अशी विनंती त्याने केली आहे.

‘नातेसंबंध मनोरंजनाचा विषय नाहीत’

अविनाशने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिलं, ‘मित्रांनो, आता या सगळ्या गोष्टी मागे सोडून पुढे जाऊया. मागील काही आठवडे अनेकांसाठी कठीण होते. सर्व मीडिया पेजेसना विनंती आहे की, प्रत्येकाच्या खासगी आयुष्याचा आदर करा. नातेसंबंध हे वैयक्तिक असतात, ते सार्वजनिक मनोरंजनाचा विषय नाहीत. प्रत्येक गोष्ट ही व्ह्यूज आणि एंगेजमेंटसाठी नसते. लोकांना शांततेत जगू द्या.’ अविनाशने त्याच्या पोस्टमध्ये ईशाचं नाव घेतलेलं नाही. तसंच दोघांचं ब्रेकअप झालं आहे की नाही, याबाबतही कोणतंही स्पष्ट विधान केलेलं नाही. मात्र, त्याच्या या पोस्टमुळे सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे.

अविनाशची पोस्ट-

ईशाच्या आईची कथित व्हॉइस नोट व्हायरल

अविनाश आणि ईशाच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना सोशल मीडियावरील काही घडामोडींमुळे सुरुवात झाली. दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर ईशाच्या आईची असल्याचा दावा करण्यात आलेली एक व्हॉइस नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली. या कथित व्हॉइस नोटमध्ये अविनाशने ईशाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आल्याचं वृत्त आहे. मात्र, या आरोपांबाबत अविनाशने कोणतंही थेट स्पष्टीकरण दिलेलं नाही. ईशानेही अद्याप ब्रेकअपच्या चर्चांवर सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘बिग बॉस 18’मध्ये झाली होती पहिली भेट

अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह यांची पहिली भेट सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस 18’ या रिअॅलिटी शोमध्ये झाली होती. ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झालेल्या या शोमध्ये दोघांची मैत्री झाली. त्यांच्यातील जवळीक आणि एकमेकांसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. शो संपल्यानंतरही दोघं अनेकदा एकत्र दिसले. त्यांनी ‘काला छा काला’, ‘आओ ना’ आणि ‘हीरिये’ यांसारख्या म्युझिक व्हिडीओंमध्येही एकत्र काम केलं. त्यामुळे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

रिअॅलिटी शोमध्ये नात्याची दिली होती कबुली

विशेष म्हणजे, अविनाशने ‘खतरों के खिलाडी 15’ या शोचं विजेतेपद पटकावल्यानंतर आयोजित केलेल्या पार्टीत ईशाचं कौतुक केलं होतं. यावेळी त्याने ईशाला ‘आय लव्ह यू’ असं म्हटलं होतं. त्यानंतर ‘पती पत्नी और पंगा 2’ या शोमध्येही दोघांनी आपल्या नात्याबद्दल स्पष्ट संकेत दिले. अविनाशने आपण केवळ चांगले मित्र नसून त्यापेक्षा अधिक असल्याचं सांगितलं होतं. मात्र, या कबुलीनंतर काही दिवसांतच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या.

दरम्यान, या चर्चांदरम्यान ईशा सिंह आपल्या कुटुंबासह उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तिथले फोटो शेअर करत तिने ‘जेव्हा मला सर्वाधिक गरज होती, तेव्हा त्याने मला बोलावलं. त्याला सगळं माहीत आहे आणि तो माझं रक्षण करेल, असा मला विश्वास आहे’, अशा आशयाची पोस्ट केली होती. तिच्या या पोस्टचीही सोशल मीडियावर चर्चा झाली.

Follow Us
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...