
वास्तुशास्त्रात जसे घराबाबत काही नियम सांगितलले आहेत. त्याचपद्धतीने बाथरूमच्या दाराशी संबंधित देखील काही नियम सांगितले आहेत. जसं की आतापर्यंत तुम्ही तुमच्या बाथरुमचे दाप उघडं ठेवत असला तर नुकसान करून घेत आहात. वास्तुशास्त्रात बाथरूमची दिशा, टॉयलेट सीट इत्यादींना खूप महत्त्व असते. चुकीच्या दिशेने बांधलेले बाथरूम घरात मोठा वास्तुदोष निर्माण करते. यामुळे पैशाचे देखील नुकसान होते, गरिबी वाढते, घरात भांडणे आणि वाद होतात. घरातील सदस्य वारंवार आजारी पडू लागतात. बाथरूम-टॉयलेटच्या दाराबद्दलही वास्तूशास्त्रात नक्की काय सांगितले जाते तसेच बाथरुमचे दार जास्त वेळ उघडे करून ठेऊ नये असे का म्हटले जाते हे जाणून घेऊयात.
बाथरूमच्या दाराशी आणि त्याच्या दिशेशी संबंधित काही नियम आहेत.
बाथरूमच्या दाराशी आणि त्याच्या दिशेशी संबंधित काही नियम आहेत. बाथरूम बांधल्यानंतरही एखादी व्यक्ती अनेकदा अशा चुका करते, ज्यामुळे वास्तुदोष होऊ शकतात. अनेकदा आपण हे पाहिले असेलच की काही लोकांना बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवण्याची सवय असते. जर तुम्हीही जाणूनबुजून किंवा नकळत ही चूक करत असाल तर आता तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद का ठेवावा?
घराच्या या कोपऱ्यात सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते. म्हणूनच असे म्हटले जाते की ही जागा वेळोवेळी स्वच्छ ठेवली पाहिजे. येथे साचणाऱ्या घाणीमुळे संपूर्ण घरात हळूहळू या नकारात्मक उर्जेा वाढली जाते. म्हणूनच बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवण्याची सूचना दिली जाते. जे लोक जाणूनबुजून किंवा नकळत बाथरूमचा दरवाजा नेहमी उघडा ठेवतात. त्यांना केवळ त्यांच्या घरात समस्यांना तोंड द्यावे लागत नाही तर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातही अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. वास्तुशास्त्रानुसार, बाथरूम ही अशी एक जागा आहे जिथे नकारात्मक उर्जेची सर्वात जास्त कंपने निर्माण होतात. अशा परिस्थितीत संपूर्ण घराचे वातावरण असंतुलित होऊ लागते.
या गोष्टींकडेही लक्ष द्या
वास्तुशास्त्रानुसार, बाथरूमबाबत काही इतर नियम आहेत ज्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. बाथरूममध्ये ओलसरपणा असल्यास तो ताबडतोब दुरुस्त करावा कारण यामुळे वास्तुदोष देखील होतो. नकारात्मकता टाळण्यासाठी, येथे नेहमी फ्रेशनर वापरावे. तसेच, बाथरूमच्या भिंतींचा रंग देखील हलका असावा. तसेच बाथरुममधील नळ बिघडले असतील त्यातून सतत पाणी टपकत असेल तर ते सर्वात आधी दुरुस्त करावं. कारण त्यामुळे आर्थिक अडचणी येतात असं म्हटलं जातं.
आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक परिणाम
बाथरुमचे दार केवळ उघडे ठेवल्याने वास्तूशास्त्रानुसार नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देकील धोकादायकच आहे. कारण बाथरूम कितीही स्वच्छ वाटत असलं तरी देखील सर्वात जास्त संसर्ग आणि आजार तिथूनच पसरतात. कारण बाथरुममधून अनेक सुक्ष्म जीव बाहेर पडत असतात. त्यामुळे नक्कीच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)