
आपल्या हिंदू धर्मात कालभैरव जयंतीचे खूप महत्त्व आहे. तर हे भगवान शिवाचे उग्र आणि उत्साही रूप असलेल्या कालभैरवाला समर्पित आहे. याला भैरव अष्टमी आणि कालष्टमी असेही म्हणतात. असे मानले जाते की भगवान कालभैरव या दिवशी प्रकट झाले होते. या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांना भय, पाप आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक उर्जेपासून मुक्तता मिळते. चला या पवित्र तिथीचे प्रमुख पैलू आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
काल भैरव जयंती कधी आहे?
हिंदू कॅलेंडरनुसार अष्टमी तिथी मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजून 08 मिनिटांनी सुरू होते आणि अष्टमी तिथी बुधवार, 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10वाजून 58 मिनिटांनी संपते. उदय तिथी लक्षात घेता, कालभैरव जयंती बुधवार 12 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल.
कालभैरव जयंतीचे महत्व
भगवान कालभैरवाला “काशीचा कोतवाल” म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी त्यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती, शत्रू आणि अडथळे दूर होतात. शिवाय ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू किंवा शनि दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते. तंत्र-मंत्र पद्धतींसाठी देखील या तिथीचे विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी कालभैरव देवाच्या पुजेशिवाय भगवान विश्वनाथाची पूजा अपूर्ण मानली जाते.
कालभैरव जयंती पूजा विधी
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य करावे. त्यानंतर देवघराची स्वच्छता करून पूजा करावी. त्यानंतर कालभैरव देवाचा अभिषेक करावा व गंगाजलाने महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करावा. अभिषेक झाल्यावर देवांना पांढरे चंदन आणि पांढरी फूले अर्पण करा. तुम्हाला जर शक्य असल्यास उपवास ठेवा आणि व्रत ठेवण्याचा संकल्प करा.
कालभैरव जयंतीच्या दिवशी हे कार्य अवश्य करावे
दीपदान – कालभैरव मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भैरव देवाचे ध्यान करा.
नैवेद्य – कालभैरव देवाला नैवेद्यात जिलेबी, उडीद डाळ वडे आणि नारळ अर्पण करा.
मंत्र जप – “ओम काल भैरवया नमः” किंवा “ओम ह्रीं बटुकाय आपदुद्धाराय कुरुकुरु बटुकाय ह्रीं” या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा.
भैरव अष्टक पथ – कालभैरव अष्टक पठण केल्याने भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)