Gudi Padawa 2022 | गुढीपाडव्याचे धर्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या गुढी कशी उभारावी

| Updated on: Mar 31, 2022 | 3:01 PM

हिंदू धर्मात (Hindu) गुढीपाडवा हा खूप महत्वाचा सण मानला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन गोष्टी सुरु करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

Gudi Padawa 2022 | गुढीपाडव्याचे धर्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या गुढी कशी उभारावी
gudi padwa
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात (Hindu) गुढीपाडवा हा खूप महत्वाचा सण मानला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन गोष्टी सुरु करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो. आपल्या राशिचक्राची सुरुवात मेष राशीपासून होते. चैत्र महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. म्हणून चैत्र हा वर्षांतील पहिला महिना आहे. या चैत्र (Chaitra) महिन्यात पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. म्हणून त्या नक्षत्रावरून चैत्र हे नाव पडले आहे. तेव्हा चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हाच वर्षांरंभाचासुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसारदेखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी गुढीपाडव्याचा सण 2 एप्रिल 2022 (saturday) आहे.

गुढीपाडव्याचा मुहूर्त

फाल्गुन अमावास्य 1एप्रिल 2022 रोजी सकाळी 11वाजून 53 मिनिटांनी संपलेल. तेव्हा अमवास्या संपल्यानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल 2022 च्या रात्री 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत राहील. तिथीनुसार हा उत्सव 2 तारखेला साजरा केला जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.

विशेष योग!

यंदा गुढी पाडव्याला इंद्र योग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. अमृत ​​सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग 1 एप्रिल रोजी सकाळी 10.40 ते 2 एप्रिल रोजी सकाळी 6.10पर्यंत आहे. त्याच वेळी 2 एप्रिल रोजी सकाळी 8.31पर्यंत इंद्र योग आहे. दुसरीकडे, नक्षत्राबद्दल बोलायचे झाल्यास, गुढी पाडव्याला रेवती नक्षत्र सकाळी 11.21पर्यंत असून, त्यानंतर अश्विनी नक्षत्र सुरू होईल. पौराणिक मान्यतेनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्रीरामांनी बालीचा वध करून दक्षिण भारतातील लोकांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. चला तर, मग आज जाणून घेऊया गुढीपाडवा कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे…

गुढी कशी उभारावी –

  1. गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात.
  2. काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते.
  3. ज्या भागाला गुढी उभारायची आहे, तिथली जागा स्वच्छ करुन धुऊन पुसून घ्यावी.
  4. त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवावी.
  5. तयार केली गुढी दारात, गच्चीवर, गॅलरीत लावावी.
  6. गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी.
  7. निरंजन लावून उदबत्ती ओवाळावी.
  8. दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवावं.
  9. दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवावे.
  10. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरवावी.

संबंधीत बातम्या

Hindu New Year 2022 Horoscope | हिंदू नववर्षाला या 5 राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस ! पुढील वर्ष जाणार आनंदात

कानडा राजा पंढरीचा, श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श दर्शनाची लगबग, मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी सुरु

Mercury transit | सावधान ! बुध बदलणार आपली दिशा,12 एप्रिलपर्यंत या 3 राशींवर होणार वाईट प्रभाव!