
हिंदू धर्मात शरद पौर्णिमा सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी शरद पौर्णिमा (kojagiri Purnima 2023) 28 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. पौराणिक मान्यता आहे की या दिवशी चंद्र 16 चरणांनी भरलेला असतो. शरद पौर्णिमेला पूनम पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू धर्मशास्त्रात कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व सांगितलं गेलं. या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीतलावर वास असतो असं सांगितलं जातं. तर चंद्रापासून निघणाऱ्या शीतल किरणोत्सर्गामुळे त्याचं महत्त्व आणखी अधोरेखित होतं. कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबर 2023 रोजी पडत आहे. पण या दिवशी चंद्रग्रहण असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी शरद पौर्णिमा शनिवार, 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 04.17 वाजता सुरू होईल आणि रविवार, 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 01.53 वाजता समाप्त होईल. शारद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर विहार करते आणि ज्या घरांमध्ये प्रकाश आणि स्वच्छता असते त्या घरांवर आपला आशीर्वाद असतो, अशी धार्मिक मान्यता आहे. यामुळेच शरद पौर्णिमेच्या रात्री लोक आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवतात.
शरद पौर्णिमेच्या रात्री लोकं चंद्राच्या प्रकाशात दूध आटवतात आणि रात्री खुल्या आकाशाखाली ठेवतात. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशीसुद्धा सेवन करतात. या दिवशी चंद्राच्या किरणांमुळे अमृतवृष्टी होते आणि चंद्रप्रकाशात खीर ठेवल्याने ती अमृतसारखी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यावेळी शरद पौर्णिमेला चंद्रग्रहणही होणार आहे, त्यामुळे या काळात दूध आटवू नये. या काळात सुतक कालावधीही वैध असेल.
हिवाळ्यात गरम दूध पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. या दिवशी चुकूनही दारूचे सेवन करू नये. तो अशुभ मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही पैशाचे व्यवहार करू नयेत. या दिवशी कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा कोप होतो. शरद पौर्णिमेच्या दिवशी सवाश्न महिला घरी आल्यास तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देवू नये. शक्य झाल्यास त्यांची ओटी भरावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)