AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Magh Purnima 2023: माघ पैर्णिमेच्या दिवशी अवश्य करा हे काम, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने होईल धनलाभ

या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी काही महत्त्वाचे काम केल्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होऊ शकते.

Magh Purnima 2023: माघ पैर्णिमेच्या दिवशी अवश्य करा हे काम, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने होईल धनलाभ
माघ पौर्णिमाImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 31, 2023 | 8:23 PM
Share

मुंबई, माघ पौर्णिमेला (Magh Purnima 2023) दान आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे. यावेळी 5 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी होणार आहे.  माघ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्याही महत्त्व आहे, कारण या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. कारण या दिवशी चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करतो. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गातील सर्व देवी-देवता पृथ्वीवर येतात आणि गंगेत स्नान करतात. त्यामुळे या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी काही महत्त्वाचे काम केल्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होऊ शकते.

माघ पौर्णिमा 2023 शुभ मुहूर्त

माघ पौर्णिमा सुरू होते: 4 फेब्रुवारी 2023 शनिवारी रात्री 9.28 वाजता

माघ पौर्णिमा समाप्ती: 5 फेब्रुवारी 2023 रविवार रात्री 11.59 वाजता

हे विषेश योग

माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, आश्लेषा नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 07:06 पासून सुरू होत आहे, जो दुपारी 12:13 पर्यंत राहील.

माघ पौर्णिमेला हे ज्योतिषीय उपाय करा

  1. माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. कारण भगवान विष्णू पिंपळाच्या झाडावर वास करतात असे मानले जाते. म्हणूनच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. असे केल्याने पितरही प्रसन्न होतील.
  2. माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती पवित्र नदीत स्नान करतो. त्याला मोक्ष मिळतो. तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर शास्त्रानुसार या दिवशी घरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगण्याचा नियम आहे.
  3. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला दूध आणि गंगाजलाने अभिषेक करा. तसेच श्री सुक्तमचे पठण करावे. असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल.
  4. माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीने तीळ, घोंगडी, तूप, फळे इत्यादी वस्तूंचे दान करावे. असे केल्याने तुम्हाला माँ लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...