काशीमध्ये भरत आहे महाकुंभाची शाळा, विद्यालयांमध्ये मुलांना शिकवला जात आहे महाकुंभाचा इतिहास आणि महत्त्व

वाराणसीच्या प्राथमिक शाळेमध्ये मुलांसाठी विशेष वर्ग आयोजित केले जात आहे. या वर्गामध्ये मुलांना महा कुंभाचे महत्त्व आणि इतिहास शिकवला जात आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये एक शिक्षक नेमण्यात आला आहे. या शिकवणीचा विद्यार्थी आनंद घेत आहेत.

काशीमध्ये भरत आहे महाकुंभाची शाळा, विद्यालयांमध्ये मुलांना शिकवला जात आहे महाकुंभाचा इतिहास आणि महत्त्व
mahakumbh
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jan 28, 2025 | 3:30 PM

एकट्याच उत्तर प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशात महा कुंभ मेळावा साजरा केला जात आहे. महाकुंभाच्या व्यवस्थेबाबत उत्तर प्रदेश सरकारने कोणतीही कसर सोडली नाही. महाकुंभाला पोहोचणारे लोकही हे मान्य करत आहेत. त्यासोबतच उत्तर प्रदेश सरकारने अशी व्यवस्था केली आहे की ज्याद्वारे जे लोक काही कारणास्तव महा कुंभाला जाऊ शकत नाही त्यांनाही महा कुंभ आणि त्याचे महत्त्व कळेल. यासाठी उत्तर प्रदेश सरकारने महा कुंभाच्या संदर्भात काशीमध्ये अनोखी शाळा सुरू केली आहे. या शाळेमध्ये मुलांना महा कुंभाचे वैशिष्ट्ये महत्त्व आणि महात्म्य शिकवले जात आहे.

शाळेमध्ये यासाठी नियमित वर्ग भरवण्यात येत आहेत. या काळात मुलांना स्वतः शिकण्यासाठी आणि घरी जाऊन त्यांच्या पालकांना सांगण्यासाठी प्रोत्साहित केला जात आहे. या संदर्भात एक पुस्तकाही तयार केली आहे. या तीन पाणी पुस्तकात महा कुंभाचे महत्त्व, महा कुंभाची कथा आणि महा कुंभाचे किती प्रकार आहेत या संबंधित माहिती दिली आहे. तसेच यावेळी महा कुंभात कोणत्या सुविधा आहेत हेही सांगण्यात आले आहे. या सर्व विषयांवर माहिती देण्यात आली असून नोट्स देखील दिल्या गेल्या आहेत.

प्रत्येक शिक्षकावर देण्यात आली आहे शिकवण्याची जबाबदारी

प्राथमिक शाळेमध्ये या पुस्तकाचे वितरण करण्यात आले असून त्या पुस्तकांमधून मुलांना शिकवले जात आहे. महा कुंभाच्या वैशिष्ट्यांवर आधारित वर्ग दररोज आयोजित केले जात आहे. यासाठी एका शिक्षकाला याची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेश मध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे. ज्यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये महा कुंभा विषयी शिकवले जात आहे. यामध्ये सनातन संस्कृती सांगितली जात आहे. महा कुंभ म्हणजे काय? आपण कुंभात स्नान का करतो? या कुंभात स्नान करण्याचे महत्त्व आणि त्याचे फळ काय आहे हे फलकावर लिहून मुलांना समजावून सांगितले जात आहे.

मुले घेत आहे या शिकवणीचा आनंद

वर्गात शिकवण्यासाठी हे पुस्तक प्रथम मुलांमध्ये अभ्यासक्रम म्हणून वितरित करण्यात आले. मुलांना महा कुंभाबद्दल शिकवणारे शिक्षक सांगतात की पौराणिक ज्ञान देण्याचा असा अनोखा प्रयत्न आणि यंत्रणा प्रथमच सुरू करण्यात आली आहे. या प्रयत्नांमधून मुलांना आपली सभ्यता आणि संस्कृतीचे ज्ञान मिळेल असे त्यांनी सांगितले. कुंभ म्हणजे काय हे कळल्यावर ते घरी जाऊन आई-वडिलांनाही सांगतील. या वर्गात बसलेल्या मुलांनी सांगितले की आजपर्यंत त्यांना कुंभ म्हणजे काय हे माहित नव्हते पण आता ते कुंभ वर्गाचा आनंद घेऊ लागले आहेत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)