Mahabharat : भगवान श्री कृष्णाला का द्यावा लागला होता गीता उपदेश? कुरूक्षेत्रात नेमकं काय घडलं होतं?

| Updated on: Jul 01, 2023 | 3:50 PM

तेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना सांगितले की हा अधर्म आहे. मी स्वतःच्या कुटुंबासोबत राज्यासाठी कसा लढू शकतो. अर्जुन म्हणाला की हे माधव ! मी माझ्याच कुटुंबाविरुद्ध उभे राहू शकत नाही.

Mahabharat : भगवान श्री कृष्णाला का द्यावा लागला होता गीता उपदेश? कुरूक्षेत्रात नेमकं काय घडलं होतं?
भगवत गीता
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : भागवत गीता महाभारताच्या (Mahabharat) युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला, त्यानंतर अर्जुन महाभारताच्या युद्धात लढू लागला. भागवद गीतेत (Bhagwat Geeta) सांगितलेल्या गोष्टींचे महत्त्व आजही तितकेच आहे जेवढे युद्धभूमीत होते, पण तुम्हाला माहित आहे का की भगवान कृष्णाला भागवद गीतेचा उपदेश करण्याची गरज का होती. महाभारताच्या रणांगणात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान मानले जाते. श्रीमद भागवत गीता हा श्रीकृष्णाने सांगितलेल्या मौल्यवान वचनांचा संग्रह आहे. भारतीय परंपरेत गीतेला उपनिषद आणि धर्मसूत्रांचे समान स्थान आहे. भगवंताने दिलेले हे ज्ञान खऱ्या जीवनातही तितकेच समर्पक पणे लागू होते.

गीतेची उत्पत्ती कशी झाली?

कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रात गीतेची उत्पत्ती झाली. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले. अर्जुनाने रणांगणात पाहिले की त्याचेच कुटुंब विरोधात उभे आहे, त्यामुळे त्याला कुटुंबाच्या आसक्तीने घेरले होते. तेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना सांगितले की हा अधर्म आहे. मी स्वतःच्या कुटुंबासोबत राज्यासाठी कसा लढू शकतो. अर्जुन म्हणाला की हे माधव ! मी माझ्याच कुटुंबाविरुद्ध उभे राहू शकत नाही. तेव्हा श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला उपदेश केला आणि म्हणाले की हे पार्थ! तुम्ही तुमच्या क्षत्रिय धर्माचे पालन करा आणि क्षत्रियाप्रमाणे तुमच्या हक्कांसाठी लढा. रणांगणात अर्जुनाचे तुटलेले मनोबल जोडण्याचे कामही गीतेच्या उपदेशाद्वारे भगवंतांनी केले. त्यानंतर अर्जुन युद्धासाठी सज्ज झाला आणि त्याने धर्मरक्षणासाठी शस्त्र हाती घेतले.

गीता हे नाव कसे पडले?

गीता या शब्दाचा अर्थ गीत आहे आणि भगवद् शब्दाचा अर्थ देव आहे. श्रीकृष्णाने आपला उपदेश गायनाद्वारे दिला म्हणून त्याला गीता म्हणतात. भगवद्गीतेला अनेकदा देवाचे गीत म्हटले जाते.

हे सुद्धा वाचा

भगवत गीता वाचण्याचे फायदे

आजही अनेक लोकं भगवद्गीतेचे पालन करून जीवनातील अडचणींवर मात करतात. गीता पठण केल्याने ज्ञानाबरोबरच मनःशांतीही प्राप्त होते. रोज गीतेचे पठण केल्याने जीवनातील समस्यांचे निराकरण होते. असेही मानले जाते की गीता पठण करताना हातात धागा बांधल्याने नकारात्मक शक्ती दूर राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)