महाकुंभमेळ्यात आवतरले ‘गोल्डन बाबा’, अंगारवर 6 कोटींचे दागिने; तपश्चर्येचा संबंध काय?

प्रयागराज या संगमनगरीत साधू-संतांची अनोखी रूपे आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ६ कोटी रुपयांच्या सोन्याने सजलेले 'गोल्डन बाबा'. या सोन्याचा संबंध त्यांच्या साधनेशी आहे, असं या महाराजांचे म्हणणे आहे. दरम्यान या महाकुंभमेळ्यात त्यांना गोल्डन बाबा असे म्हणतात तर या नावाचा त्यांना आक्षेप नाहीये हे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

महाकुंभमेळ्यात आवतरले गोल्डन बाबा, अंगारवर 6 कोटींचे दागिने; तपश्चर्येचा संबंध काय?
golden baba
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 18, 2025 | 4:38 PM

महाकुंभमेळ्याला १३ जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. या सुंदर प्रयागराजच्या संगमनगरीतील महाकुंभात साधू-संतांची अनेक अद्भुत रूपे पाहायला मिळत आहेत. त्यांपैकी भक्तांचे लक्ष वेधून घेणारे अनेक बाबा अनेक साध्वी देखील आपण पहिले आहेत. पण यासोबत आणखीन एका गोल्डन बाबाने या मेळ्यात आलेल्या भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. एसके नारायण गिरी जी महाराज असे त्यांचे नाव असून ते मूळचे केरळचे आहेत. ते सध्या दिल्लीत राहत असून हे निरंजनी आखाड्याशी निगडित असलेले हे बाबा त्यांच्या अनोख्या शैलीमुळे आणि सोन्याने सजवलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे कुंभमेळ्यात चर्चेचा विषय ठरले आहे.

महाकुंभ मेळ्यात आकर्षणाचे विषय ठरलेले गोल्डन बाबा जवळपास 4 किलो सोनं परिधान करून फिरतात, ज्याची किंमत अंदाजे 6 कोटी रुपये इतकी आहे. तर बाबानी परिधान केलेल्या प्रत्येक दागिन्यांच्या तुकड्याला एक अनोखी चमक आहे. त्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या, बांगड्या, घड्याळे इतकच नाही तर सोन्याची काठीही आहे. त्यांच्या भक्तीचे प्रतीक म्हणून ही काठी देवतांच्या लॉकेटने सजविण्यात आली आहे. हे गोल्डन बाबा म्हणतात की हे सोने त्यांच्या साधनेशी जोडलेले आहे आणि दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्यात आध्यात्मिक शक्ती आहे.

६७ वर्षीय असलेले गोल्डन बाबा यांनी आखाड्याचे अध्यक्ष रवींद्र पुरी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली आणि निरंजनी आखाड्यात सामील झाले. बाबा शिक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत. धर्म आणि शिक्षण या दोन्हींची सांगड घालून समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

बाबा जिथे जातात तिथे श्रद्धावंतांची गर्दी जमते. भक्त त्यांना गोल्डन बाबा म्हणतात. तर एसके नारायण गिरी जी महाराज म्हणतात की त्यांना यावर काहीच आक्षेप नाही. दरम्यान बाबांकडे सोन्याचे सहा लॉकेट असून, त्यापासून सुमारे २० सोनाच्या माळा तयार करता येतील. तर दुसरीकडे त्याचा मोबाईल देखील हा सोन्याने मढलेला आहे. बाबा म्हणतात की त्यांची प्रत्येक वस्तू प्रत्येक विषय हे सर्व काही साधनेशी संबंधित आहे. त्यांचे सोन्याने सजलेले सुशोभित रूप हे दिखाव्यासाठी नसून त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचे आणि गुरूंप्रती असलेल्या श्रद्धेचे प्रतीक आहे. कुंभमेळ्यात भक्तांसाठी बाबांचे व्यक्तिमत्त्व एक अनोखी प्रतिमा सादर करत आहे , लोकांना त्याचे रूप हे भुरळ घालतं आहे. तर महाकुंभमेळ्यात आलेल्या भक्तांसाठी गोल्डन बाबा हे अध्यात्म आणि भक्तीचा संदेश देतात.