कोणार्कच्या सूर्य मंदिरांचा तो भाग 122 वर्ष का होता बंद? काय आहे रहस्य? मंडप उघडताच…
कोणार्कचं सूर्य मंदिर हे ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात बंगालच्या उपसागराच्या किनारी आहे. कोणार्कच्या सूर्य मंदिराचा जो मंडप 122 वर्षांपासून बंद करून ठेवण्यात आला होता, त्या मंडपाचं नाव नृत्य मंडप असं आहे.

कोणार्कचं सूर्य मंदिर हे ओडिशाच्या पुरीजवळ असलेलं 13 व्या शतकातील एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. या मंदिराचा मुख्य हॉल अर्थात मंडप गेल्या 122 वर्षांपासून बंद आहे. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला सूर्य मंदिराच्या भिंतीला आणि छताला भेगा पडल्या होत्या, त्यामुळे हे मंदिर कोसळू शकतं अशी भीती त्या काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांना होती, त्यामुळे त्यांनी मंदिराचे चारही प्रवेशद्वार बद केले आणि आतील संरचनेवर दबाव येऊन हे मंदिर पडू नये यासाठी त्यामध्ये वाळू भरण्यात आली. कोणार्कच्या सूर्य मंदिराचं निर्माण तेराव्या शतकात करण्यात आलं होतं. हा एक अमूल्य असा ऐतिहासिक ठेवा असल्यामुळे त्याचं जतन होणं गरजेचं होतं. त्यामुळे त्या काळात हा उपाय करण्यात आला होता, हा एक अस्थायी स्वरुपाचा उपाय होता, मात्र नंतरच्या काळात या मंदिरासाठी इतर कुठल्याही स्वरुपाची उपाय-योजन करण्यात आली नाही. मात्र आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यामार्फत यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, हा मंडप उघडून त्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कोणार्कचं सूर्य मंदिर हे ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात बंगालच्या उपसागराच्या किनारी आहे. कोणार्कच्या सूर्य मंदिराचा जो मंडप अस्थानी काळासाठी बंद करून ठेवण्यात आला होता, त्या मंडपाचं नाव नृत्य मंडप असं आहे, त्याला जगमोहन असं देखील म्हटलं जातं. असं म्हणतात की जो मंडप तब्बल 122 वर्षांपासून बंद होता, तो या सूर्य मंदिराचा मुख्य भाग आहे. हा मंडप तब्बल 128 फूट उंच आहे. या मंडपाची निर्मिती ही नाट्य आणि नृत्य प्रदर्शनासाठी करण्यात आली होती. या मंडपामध्ये सूर्य देवांच्या मूर्तीची देखील स्थापना करण्यात आली होती. कधी काळी हे मंदिर, अनुष्ठान, अवकाश संशोधन, आणि अध्यात्माचं केंद्र होतं. मात्र हे मंदिर शेकडो वर्षांपासून समुद्राच्या किनारी असल्यामुळे चक्रीवादळं, खारे पाणी आणि बाष्पयुक्त हवा यामुळे मंदिराची मोठ्या प्रमाणात झिज झाली. त्यामुळे 1903 साली इंग्रजांनी हा मंडप वाळू आणि विटांनी भरून बंद केला होता.
दरम्यान एका रिपोर्टानुसार आता पुन्हा एकदा आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यामार्फत यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, हा मंडप उघडून त्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान असाच एक प्रयोग 50 वर्षांपूर्वी देखील झाला होता. हवेतील ओलाव्यामुळे या मंदिराची मोठ्या प्रमाणात झिज झाली आहे.
