Video: सुजलेले डोळे, तोंडाला मास्क; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधना पहिल्यांदाच आली सर्वांसमोर
Viral Video: सध्या सोशल मीडियावर महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती लग्नानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर येताना दिसत आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. स्मृती संगीतकार पलाश मुच्छलशी लग्न करणार होती. पण काही कारणास्तव त्यांचे लग्न मोडले. लग्न मोडण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्मृतीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न मोडल्याची माहिती दिली. त्यानंतर आता पहिल्यांदाच स्मृती सर्वजनिकरित्या सर्वांसमोर आली आहे. तिचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
तोंडाला मास्क, डोळे सूजलेले
सोशल मीडियावर स्मृती मानधनाचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये स्मृती दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान तिने निळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातला आहे. तसेच त्याला मॅचिंग पँट देखील घातली आहे. दरम्यान, स्मृतीचे डोळे सुजलेले दिसत आहे आणि तिच्या तोंडाला मास्क असल्याचे दिसत आहे. तिच्या हातात काळ्या रंगाची बॅग देखील दिसत आहे. स्मृती एकदम कॅज्युअल लूकमध्ये विमानतळावर दिसली होती. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी दिला स्मृतीला पाठिंबा
व्हिडीओमधील स्मृतीचे सुजलेले डोळे पाहून नेटकऱ्यांनी तिला पाठींबा दिला आहे. तुझा आम्हाला खूप अभिमान आहे, तू पुन्हा क्रिकेटच्या मैदानात जादू दाखव अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
स्वतः दिली होती लग्न मोडण्याची माहिती
स्मृती मानधनाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही आठवड्यांत अनेक तर्कवितर्क लावले जात होते, विशेषतः तिच्या लग्नाचे रीतिरिवाज थांबल्यानंतर आणि दोन्ही कुटुंबीयांनी यावर मौन बाळगल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. ७ डिसेंबरला स्मृती मानधनाने थेट पोस्ट करत पलाश मुच्छलशी लग्न तोडल्याची अधिकृत माहिती दिली होती. तसेच तिने तिच्या आणि कुटुंबियांच्या प्रायवसीचा आदर करण्याचीही विनंती केली.
स्मृतीच्या खेळाविषयी बोलायचे झाले तर नुकताच श्रीलंकेविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी तिला भारतीय संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. तसेच तिच्या भावाने, श्रवणने नुकताच स्मृती पुन्हा सराव मैदानावर असल्याच्या फोटों शेअर केला आहे.
