
Prediction of 2026 : लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. अशात मागच्या वर्षात जे काही झालं, ते नव्या वर्षात नको… असं अनेक जण म्हणत असतात. आपण प्रत्येक जण नववर्षाचं मोठ्या थाटात स्वागत असत असतो. पण काही गोष्टी अशा घडतात, ज्यामुळे संपूर्ण देशाचं मोठं नुकसान होतं आणि नागरिकांना देखील मोठा फटका बसतो… हिंदू पंचांगानुसार, 19 मार्चपासून नव्या वर्षीची सुरुवात होत आहे. 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्यापासूनच नव्या वर्षीची सुरुवात होते.. असं देखील सांगितलं जात… ज्योतिषीय मान्यतेनुसार, हे वर्ष आव्हानात्मक आणि अशांततेनं भरलेलं असल्याचं वर्णन केलं जात आहे.
जागतिक भीती सतावत आहे – ज्योतिषांच्या मते, रुद्र संवत्सर जगात अनेक गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतो. वातावरणात मोठे बदल, ज्वालामुखीचा उद्रेक, युद्धसदृश परिस्थिती, हिंसाचार आणि शक्तिशाली भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रह स्थिती आणि प्रभाव – नववर्षाचे राजा गुरू (बृहस्पती) असणार आहे. पण त्याची अवस्था अशांतता वाढवू शकते… 2025 चा अधिपती मंगळ, अशुभ ग्रहांशी विनाशकारी युती करू शकतो. शनि देखील गुरु राशी, मीन राशीतून भ्रमण करत आहे, ज्यामुळे प्रतिकूल परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे.
भारतावर संभाव्य परिणाम – भविष्यवाणीनुसार, 2026 हे वर्ष भारतासाठी आव्हानात्मक असू शकतं… राजकारणात मोठे बदल होऊ शकतात, मुख्य राज्यांमध्ये विरोधाचं संकट घोंघावत आहे… प्रदूषण आणि नैसर्गिक आपत्ती वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत भूकंप किंवा इतर आपत्ती येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
युद्ध आणि महामारीची चेतावणी – ज्योतिषशास्त्रीय गणितं असं सूचित करतात की 2026 मध्ये मंगळाची स्थिती मोठ्या युद्धाची परिस्थिती निर्माण करू शकतात आणि एकदा युद्ध सुरू झालं की ते 2027 पर्यंत चालू राहील. एवढंच नाही तर, जून – जुलै 2026 मध्ये महामारी येऊ शकते.. अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. या ज्योतिषीय भाकितांनुसार, 2026 हे वर्ष अधिक आव्हानात्मक असू शकतं.