Mangal Gochar: सिंह राशीत मंगळाचे गोचर; ‘या’ 4 राशींच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉइंट, पुढील 104 दिवस महत्त्वाचे

मंगळाच्या सिंह राशीतील गोचरामुळे ज्योतिषीय गणनेनुसार काही राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडू शकतात. पुढील १०४ दिवस चार राशींसाठी विशेष ठरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया, कोणत्या राशींना या गोचराचा लाभ मिळू शकतो.

Mangal Gochar: सिंह राशीत मंगळाचे गोचर; ‘या’ 4 राशींच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉइंट, पुढील 104 दिवस महत्त्वाचे
Mangal Gochar
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Edited By: | Updated on: Nov 25, 2026 | 6:37 PM

ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक ग्रहाच्या गोचरामुळे काही राशींच्या आयुष्यात बदल घडण्याचे संकेत मिळतात. मंगळ हा साहस, ऊर्जा, आत्मविश्वास आणि पराक्रमाचा कारक ग्रह मानला जातो. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळाने सिंह राशीत प्रवेश केला असून, या राशीत तो ९ मार्च २०२७ पर्यंत गोचर करणार आहे. या गोचराचा प्रभाव पुढील १०४ दिवस काही राशींवर विशेष स्वरूपात दिसू शकतो. या काळात मंगळासोबत सूर्याचाही प्रभाव जाणवेल, असे ज्योतिषीय गणित सांगते. या काळात काही राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात नव्या संधी, आर्थिक स्थितीत सुधारणा आणि रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः चार राशींसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. जाणून घेऊया, मंगळाच्या सिंह राशीतील गोचरामुळे कोणत्या राशींना सकारात्मक बदलांचा अनुभव येऊ शकतो.

सिंह राशी

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे हे गोचर सकारात्मक ठरू शकते. व्यवसायात असलेल्यांना चांगली प्रगती आणि लाभ मिळण्याचे संकेत आहेत. कामातील कामगिरीमुळे मान-सन्मान वाढू शकतो. आर्थिक बाबतीतही सुरू असलेल्या अडचणी कमी होतील. नोकरी करणाऱ्यांनाही या काळात काही चांगल्या संधी मिळू शकतात.

Loading...

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे राशी परिवर्तन अनुकूल ठरू शकते. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. एखादे काम वारंवार अडथळ्यांमुळे रखडत असेल, तर त्याला गती मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मनासारखे परिणाम मिळण्याची आशा आहे.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या व्यक्तींना या गोचरातून सकारात्मक संकेत मिळू शकतात. आत्मविश्वास वाढेल आणि कामातील उत्साह व गतीही सुधारू शकते. वैवाहिक जीवनातील काही प्रश्न हळूहळू सुटण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये स्थैर्य येण्यासोबतच व्यावसायिक आयुष्यातही प्रगतीचे संकेत आहेत.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीसाठी पुढील १०४ दिवस महत्त्वाचे ठरू शकतात. या काळात नशिबाची साथ मिळण्याची आणि कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग समोर येऊ शकतात. कामातील प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणीही पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us