AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mars Transit 2026 : मंगळाचा नक्षत्र बदल ठरणार लाभदायक; 2 सप्टेंबरपासून ‘या’ 4 राशींना अच्छे दिन ?

मंगळ 2 सप्टेंबर 2026 रोजी राहूच्या आर्द्रा नक्षत्रातून गुरुच्या पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्र बदलामुळे 4 राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. हा काळ काही राशींसाठी अत्यंत शुभदायक ठरेल.

Mars Transit 2026 : मंगळाचा नक्षत्र बदल ठरणार लाभदायक; 2 सप्टेंबरपासून 'या' 4 राशींना अच्छे दिन ?
| Updated on: Aug 25, 2026 | 4:54 PM
Share

Mars Nakshatra Change 2026 : खरंतर ज्योतिषशास्त्रात मंगळ देवाला साहस, पराक्रम, ऊर्जा, जमीन आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानलं जातं. मंगळाची स्थिती बदलली की सर्व 12 राशींवर त्याचा परिणाम कोणत्या ना कोणत्या स्वरूपात होतो, असं म्हटलं जातं. आता सप्टेंबरच्या सुरुवातीला मंगळ देव नक्षत्र बदलणार आहेत. या बदलाचा काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. 2 सप्टेंबर 2026 रोजी मंगळ राहूच्या आर्द्रा नक्षत्रातून बाहेर पडून देवगुरू बृहस्पतीच्या पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करतील. मंगळ या नक्षत्रात 23 सप्टेंबर पर्यंत असतील. ज्योतिषीय मान्यतेनुसार, मंगळ आणि गुरू यांचा हा नक्षत्र संबंध काही राशींसाठी शुभ परिणाम घेऊन येऊ शकतो.

2 सप्टेंबरला मंगळ बदलणार नक्षत्र

मंगळ देव 2 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजून 55 मिनिटांनी आपले नक्षत्र बदलतील. यावेळी मंगळ राहूच्या स्वामित्वाखालील आर्द्रा नक्षत्रातून बाहेर पडून देवगुरू बृहस्पतीच्या पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ऊर्जा, साहस, पराक्रम, जमीन, मालमत्ता आणि लहान भावंडांचा कारक मानला जातो. तर देवगुरू बृहस्पती यांचा संबंध ज्ञान, विस्तार, भाग्य, धर्म आणि समृद्धीशी जोडला जातो. त्यामुळे मंगळाचा गुरूच्या नक्षत्रात प्रवेश अनेक जातकांसाठी सकारात्मक परिणाम देणारा मानला जात आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार, मंगळाचा गुरूच्या नक्षत्रातील प्रवेश काही राशींसाठी करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीने सकारात्मक ठरू शकतो.

आर्द्रातून पुनर्वसु नक्षत्रात मंगळाचा प्रवेश

आर्द्रा नक्षत्राचा स्वामी राहू असून, त्याचा संबंध तीव्र बदल, संघर्ष, शोध आणि उलथापालथीशी जोडला जातो. दुसरीकडे, पुनर्वसु नक्षत्राचा स्वामी देवगुरू बृहस्पती आहे. पुनर्वसु नक्षत्राला आशा, सकारात्मकता, विस्तार आणि पुन्हा चांगल्या स्थितीत परतण्याचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे मंगळाचा पुनर्वसु नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या जीवनात नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो, असं ज्योतिषीय मत आहे.

कोणत्या राशींना होऊ शकतो फायदा ?

मेष राशी

मंगळ हा मेष राशीचा स्वामी असल्यामुळे या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव मेष राशीच्या जातकांवर विशेष मानला जातो. या काळात आत्मविश्वास आणि उत्साह वाढू शकतो. दीर्घकाळापासून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी नव्या जोमाने प्रयत्न करता येतील. करिअरमध्येही

मिथुन राशी

मंगळाचं हे नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या जातकांसाठी फायदेशीर मानलं जात आहे. या काळात तुमच्या कामाच्या जबाबदारी वाढू शकते तसेच प्रगतीची संधीही मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच नोकरी बदलण्याचा किंवा करिअरमध्ये नवीन प्रयोग करण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो.

कर्क राशी

कर्क राशीच्या जातकांना मंगळाच्या पुनर्वसु नक्षत्रातील प्रवेशामुळे काही अडचणींपासून दिलासा मिळू शकतो. रखडलेली कामं मार्गी लागू शकतात तसेच त्यांना नशिबाची साथही मिळू शकते. कुटुंबातील वातावरणात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन मार्ग किंवा संधी उपलब्ध होऊ शकते.

धनु राशी

धनु राशीसाठी हे नक्षत्र परिवर्तन विशेष महत्त्वाचे मानलं जातंय. पुनर्वसु नक्षत्राचा स्वामी बृहस्पती असून, बृहस्पती हा धनु राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे या काळात धनु राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नवी मुंबईत एफडीएने उघडकीस आणले दूध भेसळ प्रकरण
नवी मुंबईत दूध भेसळीचा पर्दाफाश, भेसळयुक्त दूध जप्त
Gen-Zना जोडण्यासाठी भाजपा मैदानात, गोविंदासाठी भाजपाचा मास्टर प्लॅन
सणांच्या माध्यमातून तरुणाईला जोडण्यासाठी भाजपची गोविंदांवर विशेष योजना
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...