
मुंबई : हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला जास्त महत्त्व असते. त्यातही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला ‘अघन पौर्णिमा’ म्हणून देखील ओळखली जाते. या वर्षातील शेवटची पैर्णिमा 18 डिसेंबरला येणार आहे. वर्षातील या शेवटच्या पैर्णिमेला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी जर कोणी उपवास ठेवला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे.
अघन पौर्णिमेच्या शुभ वेळ
पौर्णिमा तारीख सुरू होते: 18 डिसेंबर, शनिवारी सकाळी 7.25 पासून
पौर्णिमा तारीख समाप्त: 19 डिसेंबर सकाळी 10.05 वाजता
चंद्रोदयाची वेळ: 18 डिसेंबर शनिवारी संध्याकाळी 4:46 वाजता
अघन पौर्णिमेचे महत्त्व
हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा महिना खूप पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंसोबतच त्यांच्या कृष्ण स्वरूपाचीही पूजा केली जाते. या दिवशी चंद्रदर्शन केल्याने पुण्यप्राप्त होते अशी मान्यता आहे.मार्गशीर्ष पौर्णिमेला नदीचे स्नान आणि दान करण्याचेही खूप महत्त्व आहे.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधित बातम्या :