
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर घरातील झाडू बदलण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, नवरात्रीला झाडू बदलने ही केवळ एक प्रथा नाहीये, तर यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहातो. वास्तू तज्ज्ञ आणि धार्मिक विद्वानांच्या मते नवरात्रीच्या दिवसांत झाडू बदलल्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, तसेच उत्तम आरोग्य लाभतं.
घरातील साफसफाई आणि ऊर्जेचा संबंध
नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरातील साफसफाईचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो, घरातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. जुन्या झाडूमध्ये वर्षभर नकारात्मक ऊर्जा जमा होते, त्यामुळे त्या झाडूला बदललं जातं, नवरात्रीमध्ये घरात नवीन झाडू खरेदी केला जातो. आता नवरात्रीमध्ये झाडू कधी बदलावा? असा प्रश्नही अनेकांना पडतो. तर याचं उत्तर म्हणजे अमावस्या किंवा शनिवारी झाडू बदललं किंवा घरात नवीन झाडू आणणं हे शुभ मानलं जातं. या दिवशी घरात नवीन झाडू आणल्यास घरातील गरिबी दूर होते, घरात सुख, शांती, समृद्धी आणि धनाचं आगमन होतो. सोबतच कुटुंबातील व्यक्तींना उत्तम आरोग्य लाभतं.
नवीन झाडू कधी खरेदी करावा?
धर्मशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये झाडू बदलनं हे अत्यंत शुभ मानलं जातं. झाडू बदलल्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. झाडू हा अमावस्येला किंवा शनिवारी खरेदी करावा तसेच तो सकाळी खरेदी करू नये तर सायंकाळच्या वेळी खरेदी करावा असं वास्तुशास्त्र सांगतं, जुना झाडू बदलल्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, तर नव्या झाडूसोबत घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असं मानलं जातं. त्यामुळे नवरात्रीला झाडू बदलण्याची प्रथा आहे, वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रामध्ये देखील याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच आंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)