Numerlogy : एकदा भेटाल तर वश व्हाल, या मुलांकाच्या मुली बुद्धी आणि ज्ञानाच्या बळावर करतात असं काही की…

Numerology : अंकशास्त्रात, असा एक अंक आहे जो मूलांक असलेल्या मुली खूप ज्ञानी आणि बुद्धिमान असतात,असे मानले जाते. या मूलाकांच्या मुलींमध्ये इतरही अनेक गुण असतात. त्या बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Numerlogy : एकदा भेटाल तर वश व्हाल, या मुलांकाच्या मुली बुद्धी आणि ज्ञानाच्या बळावर करतात असं काही की...
Numerlogy
| Updated on: Nov 13, 2025 | 4:40 PM

Numerology : अंकज्योतिषामध्ये नऊ मूलांक (Numerology ) असतात. प्रत्येक मूलांकाचे काही विशष गुण , ताकद आणि कमकुवतपणाही असतो. मूलांकाचे गुण त्या व्यक्तीमध्ये देखील प्रतिबिंबित होतात. आज आपण अशा मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत, त्या मूलांकाच्या मुली मेहनती, ज्ञानी आणि यशस्वी मानल्या जातात. त्या त्यांच्या ज्ञानाने लोकांना प्रभावित करतात.

मूलांक 3

3 या मूलांकाखाली जन्मलेल्या मुलींना अत्यंत ज्ञानी आणि बुद्धिमान मानले जाते. कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 31 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 3 असतो असे मानले जाते. या मूलांकाचा स्वामी ग्रह गुरु आहे, जो धन, ज्ञान, संयम आणि बुद्धीचा कारक मानला जातो. स्वामी ग्रहाप्रमाणेच, 3 मूलांकाच्या मुली देखील संयम, बुद्धी आणि ज्ञानी असतात. त्या त्यांच्या ज्ञानाने इतरांना प्रभावित करतात.

मूलांक 3 असलेल्या मुलींमध्ये असतात विशेष गुण

  • या मूलांकाखाली जन्मलेल्या मुलींमध्ये इतरांचे मन जाणून घेण्याची कला असते. त्यांच्यापासून काहीही लपवणे कठीण असते. हा गुण त्यांना लोकांशी जोडतो. त्या त्यांच्या मोकळ्या स्वभावाने लोकांची मने जिंकतात. मूलांक 3 असलेल्या मुल कधीही कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटत नाहीत. त्यांना जितक्या संकटांना तोंड द्यावं लागतं, तितक्या त्या जास्त चमकतात.
  • गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे 3 मूलांक असलेल्या मुली या बुद्धिमान आणि ज्ञानी असतात. ज्यामुळे त्या त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये यशस्वी होतात. या मुली स्वतःचे स्थान निर्माण करण्यात देखील यशस्वी होतात.करिअमध्ये खूप प्रगती करतात.
    गुरु ग्रहाच्या अधिपत्यामुळे, मूलांक 3 असलेल्या मुली आध्यात्मिक विचार करणाऱ्या असतात. त्यांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक स्वभावामुळे त्यांना आनंदी कौटुंबिक जीवन मिळते आणि त्या संपूर्ण कुटुंबासह समृद्ध होतात.संपूर्ण कुटुंबाचीही प्रगति होते.
  • 3 मूलांक असलेल्या मुलींचा एक विशेष गुण म्हणजे त्यांचा सल्ला इतरांना खूप उपयुक्त ठरतो. त्या जे बोलतात ते बऱ्याचदा खरे ठरू शकते. त्यामुळे त्यांचा सल्ला ऐकणं हे इतरांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.
  • अध्यापन, वकिली आणि अध्यात्म ही अशी काही क्षेत्रे आहेत जिथे 3 मूलांक असलेल्या मुली खूप यश मिळवू शकतात. त्या प्रसिद्ध होऊ शकतात.

पण या सर्व गुणांसोबतच, 3 मूलांक असलेल्या मुलींमध्ये काही कमतरता देखील दिसून येतात. उदाहरणार्थ, कधीकधी अतिआत्मविश्वासामुळे त्या लोकांना दुखवू शकतात. त्यांचं बोलणं ऐकून लोका दुखावली जाऊ शकतात. इतरांना कमी लेखण्याची सवय त्यांना लोकांपासून दूर करू शकते. पण, जसजसा वेळ जातो तशा त्या शहाण्या होतात.वेळेनुसार त्या या दुर्गुणांवर लवकर मात करतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)