Navratri 2022: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केलेल्या या उपायांनी होईल आर्थिक तंगी दूर

| Updated on: Sep 28, 2022 | 10:14 PM

नवृत्तीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा करण्यात येते. आर्थिक चणचण आणि आरोग्याच्या समस्येचा सामना करणाऱ्यांनी यादिवशी अशा प्रकारे देवीची उपासना करावी.

Navratri 2022: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केलेल्या या उपायांनी होईल आर्थिक तंगी दूर
कुष्मांडा देवी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  शारदीय नवरात्रीच्या (Shardiy Navratri 2022) चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची (Kushmanda devi) पूजा केली जाते. विश्वाची निर्मिती करणाऱ्या तिच्या स्मित हास्यामुळे  तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते. देवीचे वाहन सिंह आहे. कुष्मांडा मातेला लाल रंगाची फुले आवडतात. त्यांचे निवासस्थान सूर्यमालेत आहे. असे म्हटले जाते की सूर्यलोकात वास करण्याची क्षमता फक्त माता कुष्मांडामध्ये आहे आणि ती सूर्य देवाला दिशा आणि ऊर्जा देते. आर्थिक सुबत्ता मिळविण्यासाठी  या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते. कूष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते अशी धार्मिक मान्यता आहे.

  1. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ‘दुर्गतिनाशिनी त्वहि दरिद्रादि विनाशिनीम्’. जयंदा धनदाम कुष्मांडे प्रणाममयम्’ या मंत्राचा 108 वेळा जप करा जेणेकरून तुमच्या जीवनातील आर्थिक त्रास लवकरात लवकर संपतील आणि भविष्यात तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही. या मंत्राच्या जपाने तुमच्या जीवनातील सर्व संकटे लवकरच दूर होतील.
  2. पैशाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी एक नारळ आणि एक लाल फूल, एक पिवळे, एक निळे फूल आणि एक पांढरे फूल मातेला अर्पण करा आणि नवमीच्या दिवशी ही फुले नदीत विसर्जित करा. नारळ तिजोरीत लाल कपड्यात ठेवा. असे केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या हळूहळू दूर होऊ लागतील.
  3. मनोविकार टाळण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठून मातेची विधिवत पूजा करावी आणि त्यानंतर ध्यानाच्या मुद्रेत आईसमोर बसून तिच्या या मंत्राचा जप करावा. मंत्र आहे- ‘वंदे वांछित कामर्थे चंद्रार्गकृत शेकरम्। सिंहरुधा अष्टभुजा कुष्मांडा यशस्विनीम्’ असे केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल.
  4. जर तुम्हाला तुमच्या विरोधकांमुळे त्रास होत असेल तर या दिवशी गुलाबाच्या फुलात कापूरचा तुकडा ठेवा. संध्याकाळी फुलात कापूर जाळून देवीला अर्पण करा, नंतर हात जोडून देवीची प्रार्थना करा. असे केल्याने हितशत्रुपासून संरक्षण  होईल.
  5. हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)