
आजच्या विसाव्या शतकात महान संतांपैकी नीम करोली बाबांचं नाव आहे. तर नीम करोली बाबा हे स्वत: हनुमान देवाचे भक्त आहेत. त्यामुळे त्यांचे भक्तही त्यांना हनुमानाचे अवतार मानतात. संत नीम करोली बाबा हे जीवनाबद्दलच्या त्यांच्या साध्या आणि सखोल समजुतीसाठी देखील ओळखले जातात. त्यांच्या मते संपत्ती ही मुळातच चुकीची नाहीये, तर पैसा व संपत्ती फक्त जीवन जगण्याचे साधन आहे. बाबांचा असा विश्वास होता की संपत्तीचा खरा उद्देश केवळ सुखसोयी मिळवणे नसून ती सेवा, दान आणि धार्मिक कर्मांसाठी वापरावी. ज्यांना संपत्तीचा हा मूलभूत अर्थ समजत नाही ते ती साठवून ठेवत नाहीत. अशातच बाबांनी सांगितले की पैसा हातात टिकत नसेल तर या 3 चुका टाळणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.
बाबा पैसे कमवण्याबद्दल काय म्हणाले?
नीम करोली बाबांनी कधीही संपत्ती मिळवण्याचा निषेध केला नाही. त्यांचा असा विश्वास होता की केवळ प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि चांगल्या कर्मांनी मिळवलेली संपत्तीच खरा आनंद देते. अशी संपत्ती केवळ व्यक्तीचे जीवन सुधारत नाही तर कुटुंबात शांती आणि स्थिरता देखील आणते. बाबांच्या मते योग्य मार्गाने मिळवलेली संपत्ती दीर्घकाळ टिकते.
सुख आणि उपभोगाच्या मोहापासून दूर राहण्यास शिकणे
बाबांचा असा विश्वास होता की अति सुख आणि उपभोगाची इच्छा माणसाला भरकटवते. हळूहळू ही इच्छा लोभामध्ये बदलते. हा लोभ माणसाला कधीही समाधानी राहू देत नाही आणि त्याला आतून गरीब बनवतो. समाधानाशिवाय कितीही संपत्ती असली तरी मन रिकामे राहते.
लोभ दुःखाचे कारण कसे बनतो
नीम करोली बाबा म्हणायचे की लोभी माणूस सतत भीती आणि चिंतेमध्ये राहतो. पैसे गमावण्याची भीती त्याला सतावते, ज्यामुळे तो वाईट निर्णय घेतो. ही भीती आणि लोभ त्याच्या समजुतीवर आच्छादन करतो आणि शेवटी तोटा सहन करावा लागतो.
अप्रामाणिक संपत्तीने आनंद मिळत नाही
बाबांच्या मते, चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती कधीही घरात व तुमच्या जीवनात शांती आणत नाही. अशा संपत्तीमुळे आजार, मानसिक ताण आणि कौटुंबिक कलह निर्माण होतात. चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्ती तात्पुरती दिखावा करत असली तरी, शेवटी ती नुकसानच करते.
पैशाचा योग्य आणि अयोग्य वापर
नीम करोली बाबांच्यानूसार संपत्तीचा गैरवापर हा तुमच्या जीवनात दुःख वाढवतो. अहंकार, दिखाऊपणा आणि वाईट सवयींवर खर्च केलेला पैसा जीवन रिकामे बनवतो. तथापि तुम्ही कमवलेली संपत्ती, पैसा हे सेवा, दान आणि गरजूंना मदत करण्यात गुंतवलेल्यास जीवन अर्थपूर्ण आणि संतुलित बनवतो. त्यामुळे नीम करोली बाबांच्या म्हणण्यानुसार अशा धनवानचा काही उपयोग नाही जो दुसऱ्याला गरजूला मदत करत नाही, त्यामुळे अशाच माणसांच्या हातात पैसा टिकतो ज्याला याचं महत्त्व आणि योग्य वापर माहित असतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)