
वास्तुशास्त्रात असे अनेक नियम दिलेले आहेत ज्यांच्यामुळे जीवनातील अडचणी कमी करण्यास मदत होते. वास्तूशास्त्राचे नियम पाळले तर नक्कीच नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होते तसेच जीवनात सकारात्मक बदलही घडतात. घराप्रमाणेच जेवणापासून ते अंघोळीपर्यंत अनेक नियम दिलेले आहेत. त्यामध्येच झोपण्याबाबतही काही नियम वास्तूशास्त्रात सांगण्यात आलेल आहेत. बरेच लोक या नियमांबद्दल जागरूक असतात आणि ते त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वीकारतात. हे नियम कठीण नाहीत. फक्त ते समजून घेण्याची गरज आहे. नकळत अशा अनेक चुका आपण करतो ज्यामुळे त्याचा परिणाम चांगला मिळत नाही.
जसं की अनेकांना झोपताना पाण्याची बॉटल किंवा पेला बेड जवळ किंवा डोक्याजवळील एखाद्या टेबलवर वैगरे ठेवण्याची सवय असते. जेणेकरून ते मध्यरात्री गरज पडल्यास, तहान लागल्यास पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. पण तुम्हाला माहित आहे की ही सवय चांगली नाही. यामुळे नक्कीच आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतात. तसेच वास्तूशास्त्रानुसारही ते योग्य मानले जात नाही.
रात्री झोपताना डोक्याजवळ किंवा बेडजवळ पाण्याची बॉटल किंवा भांडे ठेवून झोपणे का टाळले पाहिजे हे जाणून घेऊयात.
चंद्रदोष निर्माण होऊ शकतो
शास्त्रांनुसार झोपताना डोक्याजवळ किंवा बेडजवळ पाण्याची बॉटल किंवा भांडे ठेवून झोपणे योग्य मानले जात नाही. साधारणपणे लोकांना झोपण्यापूर्वी पलंगाजवळ पाणी ठेवण्याची सवय असते, परंतु ही योग्य पद्धत नाही. असे पाणी ठेवल्याने चंद्रदोष निर्माण होतो. यामुळे मानसिक ताण आणि निद्रानाश होतो. नकारात्मकता देखील हळूहळू जीवनात मूळ धरू लागते. चंद्रदोषामुळे घरात संघर्ष सुरू होतात. या कारणास्तव, कधीही पलंगाजवळ पाणी ठेवू नये.
बेडरूममध्ये पाणी ठेवणे अशुभ
फेंगशुईनुसार, बेडरूममध्ये पाणी घेऊन झोपणे तुमच्या झोपेसाठी चांगले नाही. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा देखील येऊ शकतो. वास्तुनुसार, बेडरूममध्ये फक्त पाणीच नाही तर पाण्याशी संबंधित चित्रे देखील टाळावीत.
या ठिकाणी पाणी साठवू नका
तसेच बेडरुममध्ये पिण्याचे पाण्याची बॉटल किंवा भांडं बेडरूममध्ये कुठेही ठेवलेले असते. ते बेडसाईड टेबलवर ठेवणे सामान्य आहे. तथापि, असे करणे धोकादायक असू शकते. जर तुम्हाला पाणी साठवणे आवश्यक वाटत असेल तर ते बेडपासून दूर ठेवावे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) ृ