
मुंबई : भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांच्या चरणस्पर्शाची (Charan Sparsh Rules) मोठी परंपरा आहे. असे करणे हे सौजन्याचे आणि इतरांबद्दल आदराचे लक्षण आहे. पण तुम्हाला माहित आहे का की काही लोकांच्या पायांना स्पर्श करणे वैदिक शास्त्रात निषिद्ध आहे. असे केल्याने पुण्या एवजी पाप लागते आणि अशुभ परिणामाचे भागीदार व्हावे लागते. आज आपण जाणून घेणार आहोत चरण स्पर्श करण्याचे महत्त्वाचे नियम.
जर तुम्ही मंदिरात पूजेसाठी गेला असाल आणि तिथे तुम्हाला कोणी आदरणीय व्यक्ती किंवा वडीलधारी दिसले तर त्यांच्या पाया पडू नका. याचे कारण मंदिरात देवापेक्षा मोठं कोणीच नाही. अशा स्थितीत देवासमोर माणसाच्या पायाला स्पर्श करणे हा देव आणि मंदिर या दोन्हींचा अपमान मानला जातो.
जर एखादी व्यक्ती झोपत असेल किंवा पडून असेल तर त्याच्या पायांना अजिबात स्पर्श करू नये. असे केल्याने त्या व्यक्तीचे वय कमी होते असे मानले जाते. वैदिक शास्त्रानुसार झोपलेल्या स्थितीत फक्त मृत व्यक्तीच्या पायांनाच स्पर्श करता येतो आणि इतर कोणाचाही नाही. म्हणूनच अशी चूक करणे नेहमी टाळावे.
कोणाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन परतलेल्या वडिलधाऱ्यांच्या पायाला हात लावू नये. अशा कार्यक्रमात उपस्थित राहून परत आल्याने ती व्यक्ती अपवित्र होते. म्हणूनच त्यांच्या पायाला स्पर्श करणे टाळावे. त्यांची आंघोळ झाल्यानंतर तुम्ही त्यांना वाकून नमस्कार करू शकता, मात्र त्या व्यक्तीला जर सुतंक असेल तर त्यांच्या पाया पडू नये.
पत्नीने पतीच्या चरणांना स्पर्श करावा असे शास्त्रात सांगितले आहे. असे केल्याने कुटुंबाचे सौभाग्य वाढते, परंतु चुकूनही पतीने पत्नीच्या पायाला हात लावू नये. असे केल्याने कुटुंबावर संकटाचे ढग दाटून येतात. घरात आर्थिक समस्यांना समोर जावा लागू शकते.
धार्मिक विद्वानांच्या मते, कोणत्याही पित्याने आपली मुलगी, भाची, नात यांच्या पायांना स्पर्श करू नये. त्या सर्व देवींचे बालस्वरूप आहेत, ज्यांना भारतीय संस्कृतीत पूजनीय म्हटले जाते. अशा स्थितीत जर तुम्ही त्यांना तुमच्या पायांना स्पर्श करू दिलात तर तुम्ही पापाचे भागीदार बनता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)