Numerology 5 June 2022: तुमचा प्रिय व्यक्तीसोबत भेटण्याचा कार्यक्रम रखडणार!; रविवारचा शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jun 05, 2022 | 12:20 PM

अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल.

Numerology 5 June 2022: तुमचा प्रिय व्यक्तीसोबत भेटण्याचा कार्यक्रम रखडणार!; रविवारचा शुभ अंक आणि शुभ रंग
Follow us on

अंकशास्त्रात (Numerology 5 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (5 june lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.

  1. अंक- 1
    आज तुम्हाला यश मिळवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे लागेल. कला आणि संगीतात विशेष रुची राहील. मोकळ्या वेळेत आपण मित्रांसोबत काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. विरोधकांवर तुमचा प्रभाव राहील.
    शुभ अंक-19
    शुभ रंग- लाल
  2. अंक- 2
    घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा नुकसान होईल. आज नवीन मित्र तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळेल.
    शुभ अंक-1
    शुभ रंग – पांढरा
  3. अंक- 3
    आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. विद्यार्थी तसेच प्रॉपर्टीचे काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
    शुभ अंक- 6
    शुभ रंग – निळा
  4. अंक-4
    आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. प्रेमात थोडी निराशा होऊ शकते. गोड बोलून परिस्थिती हाताळाल. भागीदारी व्यवसायात धोका संभवतो.
    शुभ अंक- 11
    शुभ रंग – नारिंगी
  5. हे सुद्धा वाचा
  6. अंक- 5
    आज तुमची प्रकृती थोडी नाजूक असेल. कामाच्या ठिकाणीही त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, तुम्ही तुमच्या कामात लक्ष केंद्रित कराल. दिवस संमिश्र जाईल.
    शुभ संख्या- 4
    शुभ रंग – राखाडी
  7. अंक- 6
    आज घराच्या सजावटीवर खर्च होऊ शकतो. कौटुंबिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल आहे. जमीन, घर इत्यादींशी संबंधित उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. विवाहयोग्य असल्यास लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
    शुभ संख्या- 9
    शुभ रंग – हिरवा
  8. अंक- 8
    प्रगतीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायासंबंधी नव्या योजना आखाल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल तसेच जोडीदारासोबत असलेले मतभेद मिटतील.
    शुभ अंक- 4
    शुभ रंग – पिवळा
  9.  घरात अचानक पाहुणे येऊ शकतात, त्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ जाईल. कामात विनाकारण विलंब होईल ज्यामुळे पुढची कामे रेंगाळतील. व्यवहारात सावधगिरी बाळगा. सुट्टीचा आनंद घेता येईल.
    शुभ संख्या- 11
    शुभ रंग – लिंबू
  10. अंक-9
    भावंडांचे सहकार्य मिळेल. दीर्घकाळ चाललेल्या प्रेमसंबंधात मतभेदामुळे खटके उडू शकतात. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्या खास व्यक्तीला भेटण्याचा कार्यक्रम बनविला होता तो पूर्ण होणार नाही. घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात.
    शुभ संख्या- 2
    शुभ रंग- तपकिरी

 

(वरील माहिती अंकशास्त्राच्या आधारे देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये)