
हस्तरेषाशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या भविष्याचा अंदाज बांधू शकता. हातावरील रेषा तुम्हाला मिळणारे यश, तुमची प्रगती आणि अपयशाबाबत संकेत देतात. हातावर शुभ खुणा असतील तर तुम्हाला चांगले यश मिळू शकते, मात्र अशुभ खुणा असतील तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुमच्या हातावर जर एक स्टार सारखे चिन्ह असेल तर तुम्ही रातोरात करोडपती बनू शकतो. मात्र या स्टार चिन्हाचे ठिकाणही खूप महत्त्वाचे आहे. हे स्टार चिन्ह कुठे असले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तुमच्या हातावरील बुध पर्वतावर स्टार चिन्ह असेल तर असा व्यक्ती संशोधनाच्या जगात नाव कमवतो. बुध पर्वत हे ठिकाण करंगळीच्या अगदी खाल्या भागावर असते. येथे स्टार असतील तर तुमच्या जीवनात प्रगतीच्या संधी निर्माण होतात.
एखाद्या व्यक्तीच्या हातावरील सूर्य पर्वतावर स्टार चिन्ह असेल तर त्या व्यक्तीला चांगली प्रसिद्धी मिळते. त्या व्यक्तीने केलेल्या कार्यामुळे त्याची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढते. सूर्य पर्वत हे ठिकाण अनामिका बोटाच्या खाली असते. त्यामुळे या ठिकाणी स्टार असेल तर तुम्हाला लाभ होऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीच्या हातावर शनि पर्वताच्या खाली स्टार असेल तर ती व्यक्ती एका रात्रीत करोडपती बनू शकते. शनि पर्वत हा मधल्या बोटाच्या खालील बाजूस असतो. या ठिकाणी स्टार असेल तर एखादा गरीब व्यक्ती अल्पावधीत श्रीमंत बनू शकतो. त्याची संपत्ती आणि नाव तात्काळ मोठे होते.
शनि पर्वतावरील स्टार एखाद्याचे नशीब चमकवू शकतो, मात्र त्या व्यक्तीने पैशांचा गैरवापर केल्यास याचा उलट परिणाम होऊ शकतो. तुम्ही त्या पैशाचा सकारात्मक कामासाठी वापर केला तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. मात्र गैरवापर केला तर दोन वर्षांत तुमचा अपघात होऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीच्या गुरू पर्वतावर स्टार चिन्ह असेल तर ते खूप शुभ असते. अशा व्यक्तींचे भाग्य अचानक बदलते. अशा लोकांना इतरांकडून चांगला फायदा होतो. गुरू पर्वत हा तर्जनीच्या खाली असतो.
(टीप – वरील माहिती धार्मिक मान्यतेवर आणि हस्तरेषाशास्त्रावर आधारित आहे, टीव्ही 9 मराठी या लेखातील दाव्याचा पाठपुरावा करत नाही.)