Pandharpur wari 2022: पंढरपूर वारीत चोरांचा पुन्हा हैदोस; पाकिटं आणि सोनसाखळी चोरणारे सक्रिय

| Updated on: Jun 25, 2022 | 6:02 PM

पुणे, कोरोनानंतर दोन वर्षांनी निघालेल्या पंढरपूर वारीत (Pandharpur wari 2022) पुन्हा चोरीच्या घटना घडत आहेत. आषाढी एकादशी (Aashadhi ekadashi 2022) निमित्त निघणाऱ्या या पंढरपूर वारीत (Pandharpur Vari 2022) अनेक भाविक, वारकरी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावत असतात. विठुरायाच्या ओढीने ते शेकडो किलोमीटर अंतर पायी चालतात. वारकऱ्यांसाठी हा एक उत्सव असतो त्यामुळे लाखोंच्या संख्येने वारकरी ही वारी […]

Pandharpur wari 2022: पंढरपूर वारीत चोरांचा पुन्हा हैदोस; पाकिटं आणि सोनसाखळी चोरणारे सक्रिय
Follow us on

पुणे, कोरोनानंतर दोन वर्षांनी निघालेल्या पंढरपूर वारीत (Pandharpur wari 2022) पुन्हा चोरीच्या घटना घडत आहेत. आषाढी एकादशी (Aashadhi ekadashi 2022) निमित्त निघणाऱ्या या पंढरपूर वारीत (Pandharpur Vari 2022) अनेक भाविक, वारकरी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावत असतात. विठुरायाच्या ओढीने ते शेकडो किलोमीटर अंतर पायी चालतात. वारकऱ्यांसाठी हा एक उत्सव असतो त्यामुळे लाखोंच्या संख्येने वारकरी ही वारी करीत असतात. चोरट्यांनी या गर्दीचा फायदा घेत वारकरी भाविकांचे मंगळसूत्र व इतर मौल्यवान वस्तूंची चोरी केली आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज (sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) यांच्या दोन्ही पालख्या पुण्याहून पंढरपूरकडे रवाना झाल्या. करोनानंतरचा हा पहिलाच पालखी सोहळा असल्याने यंदा वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. याच दरम्यान चोरीच्या घटना घडल्या. मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे त्या चोरांना अटक देखील झाली.

पिंपरी-चिंचवड पोलीस गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी वारकऱ्यांसोबत फिरत होते. पोलिसांना काही जणांवर संशय आला की त्यांनी चोरी केली आहे. पोलिसांनी त्यांना पकडले व त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. देहू व आळंदी येथून निघालेला प्रस्थान सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला मात्र अनेकांना गर्दीचा फटका बसला. आळंदी परिसरातील देहू येथे पालखी सोहळ्यासाठी आलेल्या संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. यापैकी काही जणांना गुन्हे करताना रंगेहात पकडले आहे. दोन वर्षांनंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडला. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. याचाच फायदा चोरटे घेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीसांंनी दिलेल्या माहितीनुसार, पालखी सोहळ्यात पाकिटे, सोनसाखळी चोर येण्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हे शाखा आणि पोलिसांची आठ पथके देहू, आळंदीत तैनात करण्यात आली होती. ते रात्रंदिवस गस्त घालत होते.यात काही महिलांंचा देखील समावेश होता. सोनसाखळी आणि पर्स हिसकावल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील नाना पेठेत संत तुकाराम महाराजांची तर भवानी पेठेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम होता. याच परिसरात पालखीच्या दर्शनासाठी पुणेकरांनी आणि शेजारच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा होत्या. दोन वर्षांनी पायी होणार असल्याने पुणेकरांनी आनंदाने वारकऱ्यांचे स्वागत आणि पाहूणचारही केला. दोन वर्षांनंतर पालखी पुण्यात आल्याने गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा अनेक चोरांनी केली घेतला. यंदा 377 वा पालखी सोहळा होता. कोरोनामुळे फक्त दोनवेळा या पालखी सोहळ्यास खंड पडला होता.