Pitru Dosha : पितृदोष म्हणजे काय? तो कसा दूर करावा? जाणून घ्या सोपे उपाय

आपण अनेकदा पितृदोषाबद्दल ऐकलंच असेल, पण तुम्हाला माहितीये का? पितृदोष म्हणजे नक्की काय असतो? आणि त्यामुळे काय त्रास होऊ शकतो? तसेच तो दूर करण्यासाठी काय करावं? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

Pitru Dosha : पितृदोष म्हणजे काय? तो कसा दूर करावा? जाणून घ्या सोपे उपाय
Pitru Dosha
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 9:04 PM

जेव्हा आपल्या घरातील एखाद्या मृत पूर्वजाची एखादी इच्छा अपूर्ण राहते, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये त्याचा जीव गुंतला असेल तर त्यामुळे अशा घरात पितृदोष निर्माण होतो. पितृदोषामुळे घरावर विविध प्रकारची संकट येऊ शकतात. जसं की नोकरी किंवा व्यवसायात नुकसान, हातात पैसा न टिकणं, प्रचंड कष्ट करून देखील मेहनतीचं योग्य फळ न मिळणं, अशा घटना तुमच्यासोबत घडू शकतात. तसेच एखादी दुर्घटना, किंवा अपघात, घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं होणं. घरात सर्व सुख सविधा असून देखील मानसिक शांती न लाभणं हे देखील पितृदोषाचीच लक्षणं आहेत. जर समजा घरात पितृदोष निर्माण झाला असेल तर तो वेळीच दूर करणं गरजेचं आहे, त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

अन्नदान – असं म्हटलं जातं, अन्नदानासारखं दुसरं कोणतंही श्रेष्ठ दान नाही. अन्नदानामुळे तुमच्या घरात कोणतेही दोष असतील तर ते दूर होतात. त्यामुळे समजा एखाद्या घरात पितृदोष असेल तर अशा घरातील लोकांनी नियमितपणे अन्नदान केलच पाहिजे, यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात. घरातील पितृदोष दूर होईल, घराला बरकत प्राप्त होते. त्यामुळे हिंदू धर्मात अन्नदान महत्त्वाचं माण्यात आलं आहे.

Loading...

गो सेवा – हिंदू धर्मात गायील अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. हिंदू धर्मातील अनेक ग्रंथामध्ये गो सेवेचं महत्त्व आणि त्याच्या फळाची प्राप्ती याची देखील माहिती देण्यात आली आहे. ज्या व्यक्तीला पितृदोष असतो, किंवा ज्या कुटुंबात पितृदोष असतो, अशा कुटुंबातील लोकांनी नियमीतपणे गो सेवा करावी. गाईला दररोज गवताची पेंढी किंवा एखादी पोळी, भाकरी द्यावी, पाणी पाजाव. यामुळे तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होईल.

पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा – वास्तुशास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप पवित्र माण्यात आलं आहे. ज्या व्यक्तीला पितृदोषाचा त्रास असतो अशा व्यक्तीने दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला न चुकता प्रदक्षिणा माराव्यात यामुळे पितृदोष दूर होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us