चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी कोणाचं श्राद्ध करावं? गरुड पुराण काय सांगतं?

धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही. चांगल्या कार्यांवर नकारात्मक परिणाम होतो. पितृ पक्षाला श्राद्ध पक्ष म्हणूनही ओळखले जाते, पितृपक्षाच्या काळात येणाऱ्या प्रत्येक तिथीचं आपलं एक वेगळ महत्त्व आहे.

चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी कोणाचं श्राद्ध करावं? गरुड पुराण काय सांगतं?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 24, 2025 | 11:00 AM

धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही. चांगल्या कार्यांवर नकारात्मक परिणाम होतो. पितृ पक्षाला श्राद्ध पक्ष म्हणूनही ओळखले जाते, पितृपक्षाच्या काळात येणाऱ्या प्रत्येक तिथीचं आपलं एक वेगळ महत्त्व आहे. आज आपण चतुर्दशी श्राद्धा बद्दल जाणून घेणार आहोत.

चतुर्दशीला कोणाचे श्राद्ध करावे?

गरुड पुराणानुसार, अकाली मरण पावलेल्या पूर्वजांसाठी (जसे की अपघात, खून, आत्महत्या इ.) चतुर्दशी तिथीला श्राद्ध केले जाते. त्याचबरोबर ज्या पूर्वजांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे, त्या पूर्वजांचे या तारखेला श्राद्ध होत नाही. चतुर्दशी श्राद्धाने तृप्त होऊन पितर आपल्या वंशजांना सुख, समृद्धी, कीर्ती आणि दीर्घायुष्य देतात.

अकाली मरण पावलेल्यांचे श्राद्ध

गया येथे असलेल्या प्रेतशिला पर्वतावर अकाली मरण पावलेल्या पूर्वजांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्याचा विधी आहे. प्रेतशिला पर्वताच्या माथ्यावर एक वेदी आहे, ज्याला प्रेतशिला वेदी म्हणतात. अकाली मरण पावलेल्या पूर्वजांच्या प्रेतशिला वेदीवर श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, प्रेतशिला वेदीवर श्राद्ध आणि पिंडदान केल्याने अकाली मृत्यूच्या पूर्वजांना प्रेत योनीपासून मुक्ती मिळते. अकाली मरण पावलेल्या पूर्वजांचे पिंडदान सत्तूने केले जाते . सूर्यास्तानंतर प्रेतशिला वेदीवर राहण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत सूर्यास्तानंतर पिंडदान आणि श्राद्ध कर्म येथे केले जात नाही.

श्राद्ध का महत्त्वाचं 

आपले जे पूर्वज आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्रद्धाचा विधी केला जातो. हिंदू धर्मानुसार श्राद्धाच्या विधीला खूप महत्त्व असतं, ज्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपली पितृदोषातून सुटका होती. पितृदोषामुळे घरात निर्माण होणारे त्रास कमी होतात, म्हणून श्राद्ध केलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)