
यशाचा मार्ग तुम्ही जेवढा विचार करता तेवढा सोपा नसतो. आयुष्यात चढ -उतार हे येतच असतात. कधीकधी देव तुमची अशी परीक्षा पहातो की एका विशिष्ट क्षणी तुम्ही तुमचा संयम गमावून बसतात. मात्र आत्मविश्वास, दृढनिश्चय, देवावर विश्वास आणि कठोर परिश्रमाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता. अनेकदा असं होतं की तुम्ही खूप कष्ट करत आहात, मात्र तुम्हाला वारंवार अपयश येत आहे, त्यामुळे तुम्ही निराश होता. अशा परिस्थितीमध्ये योग्य विचार आणि देवावर असलेला विश्वास यातून तुम्हाला योग्य मार्ग मिळू शकतो, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. संत प्रेमानंद महाराज यांचे प्रसिद्ध कोट लोकांना जगण्याची प्रेरणा देतात, निराश झालेल्या लोकांना आशेचा किरण दाखवतात, असेच काही प्रसिद्ध कोट आज आपण जाणून घेणार आहोत.
तुम्ही कठोर परिश्रम करा आणि देवावर विश्वास ठेवा, हेच तुमच्या आयुष्यातील यशाचं आणि आनंदाचं गमक आहे – प्रेमानंद महाराज
जो दुसऱ्याला कष्ट देऊन स्वत: आनंदी होतो, तो आपल्या आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही, मात्र जो दुसऱ्याचे दु:ख वाटून घेतो, त्याला मदत करतो, तो आयुष्यात प्रगती करतो – प्रेमानंद महाराज
विजयी तोच होतो जो सातत्यानं कठोर परिश्रम करतो, स्वत:मध्ये काळानुरूप बदल घडून आणतो. व्यक्ती आपल्या मेहनतीमुळेच हिऱ्यासारखं चमकतो – प्रेमानंद महाराज
खरं प्रेम हे एकच असते, हजारो नाही – प्रेमानंद महाराज
भूतकाळाचं दु:ख करू नका अन् वर्तमान व भविष्याची चिंता देखील करू नका, फक्त देवावर विश्वास ठेवा आणि कर्म करत रहा, तुम्हाला यश नक्की मिळणार
प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वत:ला आनंदी ठेवायला शिका, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही देवाबरोबर जोडले जाल – प्रेमानंद महाराज
भविष्य काळाची चिंता करू नका, देवावर विश्वास ठेवा, संयम ठेवा आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या होतील – प्रेमानंद महाराज
तुम्हाला जेव्हा कठोर परिश्रम करून देखील अपयश येत तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढचा दिवस तुमचा असणार आहे, त्यामुळे संयम ठेवा- प्रेमानंद महाराज
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)