श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भिमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी, तिरुद्र महायागाला श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ…

| Updated on: Aug 01, 2022 | 9:16 AM

तिरुद्र महायागाला श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ झाला आहे. अकरा दिवसीय अतिरुद्र महायागाला दगडूशेठ गणपती मंदिरात सुरूवात झालीयं. जगाच्या कल्याणाकरीता आणि आरोग्यसंपन्न समाजाकरीता 125 ब्रह्मवृंद हा याग करीत आहेत.

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भिमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी, तिरुद्र महायागाला श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ...
Follow us on

मुंबई : श्रावण महिनाचा पहिला सोमवार (Monday) व्रतलैकल्याचा सर्वात महत्वाचा मानला जातो. आज पहिला श्रावणी सोमवारला बारा ज्योतिर्लिंगपैकी एक भिमाशंकरला पहाटेची महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर (Temple) खुले करण्यात आले. सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या भिमाशंकर देवस्थान, बारा ज्योतिर्लिंगपैकी महाराष्ट्रातील सहाव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक, हिरव्यागार वातावरणात, पाढ-या शुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर रिमझिम पाऊसात (Rain) न्याहाळुन गेला याच वातावरणात भाविकांच्या लांबलच रांगा पहाटेपासुन लागल्याचे चित्र बघायला मिळते आहे.

भिमाशंकर येथे सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

तिरुद्र महायागाला श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ झाला आहे. अकरा दिवसीय अतिरुद्र महायागाला दगडूशेठ गणपती मंदिरात सुरूवात झालीयं. जगाच्या कल्याणाकरीता आणि आरोग्यसंपन्न समाजाकरीता 125 ब्रह्मवृंद हा याग करीत आहेत. 9 ऑगस्टपर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंदिरात सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे. गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या ज्योर्तिलिंग नद्या रामेश्वरम 21 कुंडांचे जल याकाळात वापरले जात आहे.

हे सुद्धा वाचा

तिरुद्र महायागाला श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ…

श्रावण महिन्यात देवी सतीने दुस-या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली. श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केला पाहिजे. असे मानले जाते की, भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने, शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नाग देवता यांची देखील अवश्य पूजा करावी.