Raksha Bandhan 2024 shubh muhurat: रक्षाबंधन आज, जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

raksha bandhan 2024 date and time: रक्षाबंधनाला भद्रा काळात राखी बांधू नये. यामागे एक पौराणिक कथाही आहे. भद्रा काळात लंकापती रावणाच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली होती. त्यानंतर वर्षभरातच त्याचा विनाश झाला. भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे, असे म्हणतात.

Raksha Bandhan 2024 shubh muhurat: रक्षाबंधन आज, जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
raksha bandhan 2024
| Updated on: Aug 19, 2024 | 7:05 AM

Raksha Bandhan 2024: बहीण-भावाच्या नात्याचे प्रतीक असलेले रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पोर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन देतो. रक्षाबंधन यंदा 19 ऑगस्ट 2024 रोजी येत आहे. परंतु त्या दिवशी रक्षाबंधनावर भ्रदाचा प्रभाव आहे. भाद्रासारख्या अशुभ काळात राखी बांधू नये असे मानले जाते.

रक्षाबंधनचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षच्या पौर्णिमेला येतो. यंदा पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजून 4 मिनिटांनी सुरु होत आहे. पौर्णिमेची समाप्ती 19 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी होणार आहे. या दिवशी भद्रा आहे. मग राखी कधी बांधावी…

कधी बांधावी राखी

ज्योतिषाचार्योंनुसार, 19 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजून 21 मिनिटांना भद्रा सुरु होणार आहे. सकाळी 9 वाजून 51 मिनिटांपासून 10 वाजून 53 मिनिटांपर्यंत भद्राचे शेपूट राहणार आहे. सकाळी 10 वाजून 53 मिनिटांनी दुपारी 12 वाजून 37 मिनिटांपर्यंत भद्राचा मुख असणार आहे. त्यानंतर भद्राचे समापन दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. भद्राचा हा काळ अशुभ मानला जातो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. यामुळे भद्रा संपल्यावर 19 ऑगस्ट रोजी 1 वाजून 30 मिनिटांनंतर राखी बांधता येईल.

राखी बांधण्याचे मुहूर्त

19 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 43 मिनिटापासून संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे. राखी बांधण्यासाठी 2 तास 37 मिनिटे मिळतात. त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळातही राखी बांधता येते. हा काळ संध्याकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी सुरु होतो. तो रात्री 9 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे.

भद्रात राखी का बांधली जात नाही?

रक्षाबंधनाला भद्रा काळात राखी बांधू नये. यामागे एक पौराणिक कथाही आहे. भद्रा काळात लंकापती रावणाच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली होती. त्यानंतर वर्षभरातच त्याचा विनाश झाला. भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे, असे म्हणतात. भद्राला ब्रह्मदेवाकडून शाप मिळाला होता की ज्याने भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे फळ अशुभ होते.