AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव गाव जिथे पाच दिवस महिला परिधान करत नाहीत कपडे, कारण ऐकून…

भारतातील एकमेव गाव जिथे महिला 5 दिवस परिधान करत नाहीत कपडे. काय आहे यामागे नेमकं कारण?

भारतातील एकमेव गाव जिथे पाच दिवस महिला परिधान करत नाहीत कपडे, कारण ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 04, 2026 | 5:26 PM
Share

भारत हा देश विविध संस्कृती, परंपरा आणि श्रद्धांसाठी ओळखला जातो. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा दिसून येतात. अशाच एका अनोख्या परंपरेची चर्चा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पिनी गावाशी संबंधित आहे. या गावात श्रावण महिन्यात पाच दिवस विशेष धार्मिक विधी पार पडतात. ज्याबाबत स्थानिकांमध्ये मोठी श्रद्धा आहे.

हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू जिल्ह्यामधील पिनी गावात दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या काळात पाच दिवसांचा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो. स्थानिकांच्या मते हा उत्सव त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

या कालावधीत गावातील विवाहित महिला काही विशिष्ट धार्मिक नियमांचे पालन करतात. त्या पाच दिवस घरातच राहतात. एकांत पाळतात आणि बाहेर जाणे टाळतात. पती-पत्नी एकमेकांपासून दूर राहतात. ही प्रथा अत्यंत कडक नियमांनुसार पार पाडली जाते.

पुरुषांसाठीही कडक नियम

या उत्सवाच्या काळात गावातील पुरुषांवरही काही बंधने लागू असतात. या काळात त्यांना मद्यपान, मांसाहार किंवा इतर कोणतेही अपवित्र मानले जाणारे कृत्य करण्यास मनाई असते. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, नियमांचे उल्लंघन केल्यास गावावर संकट येऊ शकते. म्हणूनच संपूर्ण गाव एकत्र येऊन श्रद्धेने आणि शिस्तीने ही परंपरा पाळतो. गावकऱ्यांच्या मते, या नियमांमुळे गावाचे रक्षण होते आणि देवतेची कृपा कायम राहते.

या परंपरेमागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. स्थानिक मान्यतेनुसार, प्राचीन काळी एका राक्षसाने गावात वारंवार हल्ले केले होते. त्यावेळी गावाचे संरक्षक देवता ‘लाहु घोंडा’ यांनी त्या राक्षसाचा वध करून गावाचे रक्षण केले. त्या घटनेच्या स्मरणार्थ आणि देवतेच्या सन्मानार्थ ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

आजच्या आधुनिक काळात ही प्रथा अनेकांना वेगळी किंवा आश्चर्यकारक वाटू शकते. मात्र पिनी गावातील लोकांसाठी ही त्यांची ओळख, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे.

Disclaimer : वरील माहिती स्थानिक मान्यता आणि उपलब्ध कथांवर आधारित आहे. यामधील श्रद्धा किंवा दाव्यांची स्वतंत्र पडताळणी केलेली नाही. कोणतीही परंपरा किंवा माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...