Sankasthi Chaturthi 2021 : आषाढ महिन्याची पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात साजरी केली जाते. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी पूर्ण अंतःकरणाने पूजा करणार्‍या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीचा अर्थ संकट हरणारी चतुर्थी, मान्यता आहे की भगवान गणेश आपल्या सर्व भक्तांचे कष्ट दूर करतात (Sankasthi Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat Importance And Puja Vidhi ).

Sankasthi Chaturthi 2021 : आषाढ महिन्याची पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Lord Ganesha
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 8:59 AM

मुंबई : संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे (Sankasthi Chaturthi 2021). संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात साजरी केली जाते. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी पूर्ण अंतःकरणाने पूजा करणार्‍या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीचा अर्थ संकट हरणारी चतुर्थी, मान्यता आहे की भगवान गणेश आपल्या सर्व भक्तांचे कष्ट दूर करतात (Sankasthi Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat Importance And Puja Vidhi ).

हिंदू कॅलेंडरनुसार, संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीवर साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज (27 जून) आहे, या दिवसाचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व याबद्दल जाणून घेऊ –

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त

आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी 27 जून 2021 रोजी म्हणजेच आज आहे. या दिवशी, पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 3 वाजून 54 मिनिटांपासून ते 28 जूनला सकाळी 2 वाजून 16 मिनिटांपर्यंत असेल. संकष्टी चतुर्थी व्रत 27 जून 2021 रोजी ठेवले जाईल आणि 28 जून रोजी संपेल.

यावेळी संकष्टी चतुर्थी रविवारी पडत आहे, म्हणूनच याला रविवती संकष्टी असे म्हणतात. मान्यता आहे की ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत सूर्य कमकुवत आहे. त्यांच्यासाठी हे विशेष फायदेशीर आहे. भगवान सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, दररोज सकाळी स्नान करुन अर्घ्य द्यावे. याने आपल्या ग्रहांच्या समस्यांचे निराकरण होईल.

संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करावी

❇️ या दिवशी गणेशाची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि संकष्टी व्रताचा संकल्प करा. या विशेष दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

❇️ सर्वप्रथम पूजास्थळ स्वच्छ करा आणि त्यावर लाल कपडा घालून गणेशजींची मूर्ती किंवा फोटो ठेवा.

❇️ पूजेच्या वेळी आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेने असावा.

❇️ देवासमोर दिवा लावा.

❇️ यानंतर फुले, अक्षता, चंदन, कुंकू आणि प्रसाद म्हणून मोदक, केळी ठेवा.

❇️ यानंतर विधीवत गणेशाची पूजा करावी आणि मंत्रांचा जप करावा.

संकष्टी चतुर्थीचे महत्व

मान्यता आहे की जाते की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व दु:ख दूर होतात. या दिवशी उपास केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा कमी होते. गणेश संकष्टीचे व्रत सूर्योदयाला प्रारंभ होते आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर समाप्त होते.

Sankasthi Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat Importance And Puja Vidhi

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

शनिचे दुष्परिणाम, राहू-केतूच्या वक्रदृष्टीपासून वाचायचं असेल तर शनिवारचा उपवास करा, जाणून घ्या पद्धत आणि महत्व आणि फायदे

Ashadha Month 2021: मनोकामना पूर्ण करणाऱ्या आषाढ महिन्याला सुरुवात, जाणून घ्या त्याचं महत्व?