Shravan 2022: भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्याचा अत्यंत सोपा उपाय, पूजेदरम्यान या झाडाचे मूळ करा अर्पण 

| Updated on: Aug 03, 2022 | 6:37 AM

महादेवाची सेवा मनापासून केल्यास भक्तांना निश्चितच त्याचे फळ मिळते.  अशा वेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी पाणी, बेलाचे पान, धतुरा, भांग, चंदन इत्यादीही अर्पण केले जातात. जेणेकरून त्याची कृपा प्राप्त होईल.

Shravan 2022: भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्याचा अत्यंत सोपा उपाय, पूजेदरम्यान या झाडाचे मूळ करा अर्पण 
महादेवाची पूजा
Image Credit source: Social Media
Follow us on

सध्या महादेवाचा अत्यंत प्रिय महिना श्रावण (Shravan 2022) आहे.  श्रवणामध्ये भगवान शंकराची कृपा मिळविण्यासाठी अनेक उपाय केले जातात. श्रावणात भगवान शिवाला त्यांच्या प्रिय वस्तू अर्पण केल्या जातात. महादेवाची सेवा मनापासून केल्यास भक्तांना निश्चितच त्याचे फळ मिळते.  अशा वेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी पाणी, बेलाचे पान, धतुरा, भांग, चंदन इत्यादीही अर्पण केले जातात. जेणेकरून त्याची कृपा प्राप्त होईल. ज्योतिष शास्त्रानुसार भगवान शंकराला बेलाची पाने अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो. केवळ बेलाच्या  पानांचेच नव्हे, तर बेलाच्या झाडाच्या मुळाचेही विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. श्रावणात बेलाच्या झाडाचे मूळ भगवान शंकराला अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व दुःख दूर होतात.

बेलाच्या मुळाचे महत्त्व

 

धार्मिक मान्यतेनुसार बेलाच्या पानांशिवाय भगवान शंकराची पूजा पूर्ण होत नाही. श्रवणामध्ये त्याचे महत्त्व अधिकच वाढते. शिवलिंगाला एक तांब्या पाणी आणि बेलाची पाने अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात, असे मानले जाते. यामुळे सुख, समृद्धी आणि मानसिक शांती मिळते.

हे सुद्धा वाचा

 

आर्थिक अडचणी दूर होतील

 

बेलाच्या पानांचे मूळ भगवान शिवाला अर्पण केल्याने भक्तांच्या आर्थिक समस्या दूर होतात असे धार्मिक ग्रंथात नमूद केले आहे. असे म्हटले जाते की, ते स्वतः लक्ष्मीचे निवासस्थान आहे.

 

गरिबी होते दूर

 

शास्त्रानुसार श्रावण महिन्यात बेलाची पाने नियमितपणे भगवान शंकराला अर्पण केल्यास व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते. तसेच त्याची गरिबी दूर होते. बेलाला श्रीवृक्ष असेही म्हणतात. बेलाच्या मुळांना खीर, मिठाई वगैरे अर्पण केल्याने गरिबी दूर होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)