Shrawan 2023 : श्रावण महिन्यात झाला असेल बाळाचा जन्म तर भगवान शिवाच्या रूपांशी संबंधीत ठेवा बाळाचे नाव

शिवाच्या नावावर मुलाचे नाव ठेवल्यास त्याचा त्याला आध्यात्मीक लाभही होतो. शिवाची अनेक पौराणिक आणि वैदिक नावे देखील आहेत.  मुलाचे नाव शिवाशी संबंधीत ठेवले तर मुलासोबतच आई-वडिलांचेही कल्याण होते.

Shrawan 2023 : श्रावण महिन्यात झाला असेल बाळाचा जन्म तर भगवान शिवाच्या रूपांशी संबंधीत ठेवा बाळाचे नाव
बाळाचे नामकरण
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 23, 2023 | 9:13 AM

मुंबई : पवित्र श्रावण महिना सुरू आहे. भगवान भोलेनाथांना हा महिना अतिशय प्रिय आहे. श्रावण (Shrawan 2023) महिन्यात बाळाचा जन्म होणे भाग्याचे मानले जाते. अशा बालकावर भगवान शिवाचा विशेष आशिर्वाद असतो. अशातच जर त्या बाळाचे नाव महादेवाच्या (Hindu Boyes Name) रूपाशी संबंधीत ठेवले तर महादेवाची कृपा कायम त्याच्यासोबत राहते.  शिवाच्या नावावर मुलाचे नाव ठेवल्यास त्याचा त्याला आध्यात्मीक लाभही होतो. शिवाची अनेक पौराणिक आणि वैदिक नावे देखील आहेत.  मुलाचे नाव शिवाशी संबंधीत ठेवले तर मुलासोबतच आई-वडिलांचेही कल्याण होते. भगवान भोलेनाथांची कृपा सदैव मुलांवर राहते. मुलाच्या नावाने हाक मारण्यासोबतच शिवाचे नावही जपले जाते.

श्रावण महिन्यात जन्माला आलेल्या बाळाचे हे नाव ठेवू शकता

महेश्वर – जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव एम अक्षराने ठेवायचे असेल तर महेश्वर हा एक चांगला पर्याय असू शकतो. महेश्वर हे भगवान शिवाच्या अनेक नावांपैकी एक आहे ज्याचा अर्थ महान देव आहे. या नावाच्या व्यक्तीला कधीही नतमस्तक व्हायला आवडत नाही. हे नाव भगवान शिवाच्या पौराणिक नावांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

शंभुनाथ – जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव श अक्षराने ठेवायचे असेल तर शंभूनाथ हा एक चांगला पर्याय असू शकतो. शंभूनाथ हे शिवाच्या नावांपैकी एक आहे. म्हणजे भगवान शिवाचे निवासस्थान. शंभूनाथ नावाची मुले खूप आनंदी असतात. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव शंभूनाथ ठेवल्यास आयुष्यात सकारात्मक उर्जा राहील.

शशी शेखर – शशी शेखर हे नाव देखील भगवान शिवाच्या नावांपैकी एक आहे. जे खूप लोकप्रिय नाव आहे. शशी शेखर नावाचा अर्थ भगवान शिवाच्या डोक्यावर कोरलेला चंद्र आहे. ते एका मुकुटा सारखे आहे. हे नाव असलेले मूल अतिशय अध्यात्मिक असते आणि ते आपल्या कामात खूप समर्पित असते.

शंकर – अनेक लोकं भगवान शिवाला शंकराच्या नावाने हाक मारतात. हे नाव खूप शुभ मानले जाते. शंकराच्या नावाचा अर्थ आशीर्वाद देणारा असा आहे. ज्याने आपल्या मुलाचे नाव शंकर ठेवले आहे किंवा ठेवणार आहे, त्या मुलाचे नाव ठेवण्याबरोबरच भगवान शिवाचे नामस्मरण देखील केले जाईल.

त्रिलोचन – भगवान शिवाला कधीकधी त्रिलोचन नावाने देखील संबोधले जाते कारण भगवान शिवाला तीन डोळे आहेत आणि तीन डोळे असलेल्याला त्रिलोचन म्हणतात.

पशुपती – पशुपती हे भगवान शिवाच्या नावांपैकी एक आहे, या नावाची अनेक मंदिरे आहेत. ज्याचा अर्थ सर्व प्राणिमात्रांचा स्वामी पशुपती हे एक अतिशय सुंदर नाव आहे आणि तुम्ही तुमच्या मुलाचे नाव पशुपती देखील ठेवू शकता.कारण या नावाला खूप धार्मिक महत्त्व आहे.

अनंत – भगवान शिवाच्या सर्वात लोकप्रिय आणि शुभ नावांपैकी एक म्हणजे अनंत. अनंत नावाचा अर्थ असा आहे की जो कधीही संपणार नाही. जे कोणीही पुसून टाकू शकत नाही. या नावाचे मूल नेहमी सकारात्मक आणि उत्साही असते. त्यामुळे जर तुमच्या मुलाचा जन्म श्रावणामध्ये झाला असेल तर तुम्ही अनंतचे नाव ठेवू शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)