वनवासाच्या काळात श्री रामाने या जंगलात घालवला होता सर्वाधीक काळ, काय आहे त्याचे नाव?

| Updated on: Mar 18, 2023 | 10:30 AM

प्रभू राम वनवासात गेले तेव्हा त्यांनी अयोध्येतून प्रवास सुरू केला आणि रामेश्वरम आणि नंतर श्रीलंका येथे समाप्त झाला.

वनवासाच्या काळात श्री रामाने या जंगलात घालवला होता सर्वाधीक काळ, काय आहे त्याचे नाव?
राम वनवास
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : श्रीरामांना 14 वर्षे वनवास भोगावा लागला आणि या वनवासाच्या (Ram Vanvas) काळात श्रीरामांनी अनेक ऋषीमुनींकडून शिक्षण आणि ज्ञान प्राप्त केले, तसेच तपश्चर्या करून आदिवासी, वनवासी आणि सर्व प्रकारच्या भारतीय समाजाला संघटित करून धर्माच्या मार्गावर नेले. त्यांनी संपूर्ण भारताला एका विचारसरणीच्या धाग्यात बांधले. वाल्मिकी रामायणात राम वनवासात गेल्यावर त्यांची कथा लिहिली आहे. प्रभू राम वनवासात गेले तेव्हा त्यांनी अयोध्येतून प्रवास सुरू केला आणि रामेश्वरम आणि नंतर श्रीलंका येथे समाप्त झाला. इतिहासकार डॉ. राम अवतार यांनी श्रीराम आणि सीता यांच्या जीवनातील घटनांशी संबंधित अशा 200 हून अधिक ठिकाणे शोधून काढली आहेत, जिथे आजही श्रीराम आणि सीता कुठे राहिले किंवा वास्तव्यास आहेत अशी स्मारके आहेत. जाणून घेऊया कोणती आहेत ती ठिकाणे.

या वनात राहत होते राम-सीता आणि लक्ष्मण

राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षे वनवासात गेले आणि राक्षसांचा राजा रावणाचा पराभव करून आपल्या राज्यात परतले ही रामायणातील कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे की राम, लक्ष्मण आणि सीता यांनी जंगलात अनेक वर्षे घालवली, परंतु फार कमी लोकांना त्या जंगलाचे नाव माहित असेल. त्या वनाचे नाव दंडकारण्य होते ज्यात राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास घालवला होता. हे जंगल सुमारे 35,600 चौरस मैलांमध्ये पसरले होते, ज्यामध्ये सध्याचे छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा काही भाग समाविष्ट होता. त्या काळी हे जंगल भयंकर राक्षसांचे निवासस्थान मानले जात होते, म्हणून याला दंडकारण्य असे नाव पडले होते जेथे “दंड” म्हणजे “शिक्षा देणे” आणि “अरण्य” म्हणजे “जंगल”.

घनदाट जंगल होते दंडकारण्य

राम, लक्ष्मण आणि सीता 10 वर्षे ऋषी-मुनींच्या आश्रमात राहिले, ते सर्व दंडकारण्यमध्ये होते. दंडकारण्य हे घनदाट जंगल होते, जिथे वन्य प्राण्यांची आणि राक्षसांची भीती नेहमीच असायची. चित्रकूटच्या पुढे जंगलात प्रवेश करण्यापूर्वी अत्री ऋषींच्या आश्रमात जमलेल्या ऋषींनी रामाला राक्षसांपासून मुक्ती मिळावी अशी विनंती केली होती. या 10 वर्षांत, रामाने संपूर्ण छत्तीसगडमधून राक्षसांचा नायनाट केला, त्यानंतर ते आंध्रमार्गे दक्षिणेकडे गेले.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)