Sudarshan Chakra : भगवान श्रीकृष्णाने कशा प्रकारे प्राप्त केले सुदर्शन चक्र? काय होते याचे वैशिष्ट्ये

भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र धारण करत असत. त्यामुळे सर्व शत्रू त्यानां घाबरत होते. हे चक्र लहान असले तरी ते सर्वात अचूक शस्त्र मानले जात असे.

Sudarshan Chakra : भगवान श्रीकृष्णाने कशा प्रकारे प्राप्त केले सुदर्शन चक्र? काय होते याचे वैशिष्ट्ये
सुदर्शन चक्र
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 04, 2023 | 9:17 PM

मुंबई : सर्व देवता आपापली वेगळी चक्रे धारण करतात. या सर्वांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. उदाहरणार्थ, शंकरजींच्या चक्राचे नाव भवरेंदू, विष्णूजींच्या चक्राचे नाव कांता चक्र आणि देवीच्या चक्राचे नाव मृत्यु मंजरी. तसेच सुदर्शन चक्राचे (Sudarshan Chakra) नाव घेतल्यावर भगवान श्रीकृष्णाचे रूप समोर येते. भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र धारण करत असत. त्यामुळे सर्व शत्रू त्यानां घाबरत होते. हे चक्र लहान असले तरी ते सर्वात अचूक शस्त्र मानले जात असे. हे शस्त्र खूप शक्तिशाली होते, कारण सोडल्यानंतर ते शत्रूचा नाश केल्यानंतरच परत यायचे. हे शस्त्र कोणत्याही प्रकारे रोखणे अशक्य होते. जेव्हा-जेव्हा श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र सोडले, तेव्हा ते आक्रमण केल्याशिवाय परतले नाहीत. श्रीकृष्णाने सुदर्शनाने कुणाला ठार मारण्याऐवजी कुणाच्या तरी सामर्थ्यावर किंवा अभिमानावर प्रहार केला.

श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र कसे मिळाले

श्रीकृष्णाला भगवान परशुरामांकडून सुदर्शन चक्र प्राप्त झाले. त्यानंतर त्यांची शक्ती आणखी वाढली होती. शिक्षण घेतल्यानंतर श्रीकृष्णाची भेट विष्णूचा अवतार असलेल्या परशुरामाशी झाली. परशुरामांनी श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र दिले. यानंतर हे चक्र नेहमी श्रीकृष्णाकडे राहिले. राजा श्रीगल याचा श्रीकृष्णाने त्याच्या सुदर्शन चक्राने वध केला होता. श्रीगल हिंसक झाला होता. कोणाचीही स्त्री, मालमत्ता, जमीन तो बळकावायचा. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शिवाने सुदर्शन चक्राची निर्मिती केली होती. नंतर शिवजींनी भगवान विष्णूला सुदर्शन चक्र दिले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)