
आज सुर्य आणि बुध ग्रहामुळे एक दुर्मिळ योगाचा संयोग झाला आहे. सुर्य-बुध १८ डिग्री कोनवर स्थिर होऊन अष्टादश योग निर्माण करत आहेत. ज्योतिष शास्रात यास खूपच शुभ योग मानले जात आहे. जेव्हा हा योग तयार होतो, तेव्हा काही राशीच्या जीवनात आनंदाचे वारे वाहू लागते. चला तर या दुर्मिळ योगामुळे कोण-कोणत्या राशींच्या लोकांचे भाग्य फळफळणार आहे हे पाहूयात…
तुमच्या नेतृत्वगुणाला झळाली येऊ शकते. आत्मविश्वासात वाढ होऊन नेतृत्वाची क्षमता बहरु शकते. विरोधकांना तुमच्या समोर माघार घ्यावी लागणार आहे. वाणी आणि व्यवहारामुळे काही चांगले रंजक बदल घडण्यास मदत होणार आहे. मात्र याच वेळी कोणत्या वादात पडण्यापासून स्वत:ला वाचवा हाच सल्ला आहे.
तुमची विचार करण्याची निर्णय घेण्याची क्षमता आधी पेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणतेही काम नीट विचारपूर्वक कराल. त्यात यश मिळण्याची शक्यता मोठी असेल. समाजात तुमचे वजन वाढेल आणि मानसन्मान मिळतील. जीवनात काही वेगळे करण्याची जोखीम उचलायची असेल तर ही संधी उत्तम आहे.
सिंह रास असणाऱ्यांची तर पैशांची तंगी दूर होणार आहे. जर तुम्ही कोणाकडून पैसे किंवा कर्ज घेतल्याने चिंतेत असाल तर लवकरच यावर सन्मानजनक तोडगा निघणार आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडण्याची शक्यता आहे. रखडलेली सरकारी कामे मार्गी लागतील. कुटुंबियांच्या आणि गुरुजनांच्या सल्ल्याने चांगली प्रगती होईल.
गुंतवणूकीत जोखीम उचलणाऱ्यांना पुढे जाऊन चांगला लाभ मिळेल. विचारपूर्वक गुंतवणूक करणाऱ्याना खूप फायदा होणार आहे. मात्र, सट्टेवाजी किंवा शॉर्ट टर्मच्या स्कीमपासून सावध रहावे, त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या गोड बोलण्याने तुम्ही लोकांना आकर्षित कराल. लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील.
धुन राशीचे लोक त्यांच्या कौशल्यावर फोकस करतील. जे लोक बऱ्याच काळापासून स्वत:चा व्यवसाय किंवा काम करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी ही योग्य संधी आहे. नवीन प्रॉपर्टी ,घर, किंवा नवीन वाहन खरेदी करु शकता. विद्यार्थ्यांचे घरापासून दूर वा परदेशात जाऊन शिकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.