जुलैचा शेवटचा आठवडा या 3 राशींसाठी ठरेल शुभ, शनी आणि बुध यांचा संयोगाने होतील श्रीमंत
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात प्रमुख ग्रहांच्या हालचाली बदलत आहेत. बुध 24 जुलै रोजी मार्गी होईल आणि शनी 27 जुलै रोजी वक्री होईल. ही महत्त्वपूर्ण ग्रहयोग युती या राशींसाठी अत्यंत शुभ असेल.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रमुख ग्रहांच्या गतीमध्ये बदल होणार आहेत. 24 जुलै रोजी ग्रहांचा अधिपती बुध मार्गी होईल. याचा अर्थ या दिवसापासून बुधाची सरळ गती सुरू होईल. यानंतर बुध 24 ऑक्टोबरपर्यंत सरळ गतीत राहील. याव्यतिरिक्त 27 जुलै रोजी न्यायाच देवता शनिदेव वक्री होतील. याचा अर्थ असा होतो की या दिवसापासून शनिदेवांची वक्री गती सुरू होईल.
यानंतर शनी ग्रह 11 डिसेंबर 2026 पर्यंत वक्री अवस्थेत भ्रमण करत राहील. त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होणारी ही युती मिथुन, सिंह आणि वृश्चिक राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या राशींसाठी हा संयोग उत्तम ठरेल ते जाणून घेऊयात.
मिथुन रास
बुध ग्रहाची मार्गी गती मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप विशेष आणि महत्त्वपूर्ण ठरू शकते. बुध हा मिथुन राशीचा स्वामी असून तो मिथुन राशीत मार्गी होत आहे. यामुळे मिथुन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो.
सिंह रास
बुध ग्रह सिंह राशीच्या दुसऱ्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. सध्या बुध ग्रह हा सिंह राशीच्या घरात लाभदायक ठरत आहे. मार्गी झाल्यावर बुध सिंह राशीच्या लोकांना अधिक सकारात्मक परिणाम देऊ शकतो. या काळात तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण डील मिळू शकतात. जुने कौटुंबिक प्रश्न सुटून मनःशांती मिळू शकते.
वृश्चिक रास
बुध वृश्चिक राशीच्या आठव्या घरात मार्गी होणार आहे. बुध हा राशीचक्रातील लाभ घराचा स्वामी देखील मानला जातो. त्यामुळे, वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात अचानक आर्थिक लाभ आणि अनपेक्षित यश मिळू शकते. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण कायम राहू शकतो. नवीन संधी देखील निर्माण होऊ शकतात. करिअरमधील अडचणी कमी होऊ शकतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)