
Shani Sade Sati And Dahiya 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका निश्चित कालावधीनंतर वक्री आणि मार्गी होतात. त्याचा प्रभाव मानवी जीवनावर, देशासह जगावर दिसतो. कर्मफळ देणारा देव म्हणजे शनि देव 13 जुलै रोजी वक्री होणार आहे. वक्री झाल्यामुळे शनि देव काही राशींना तापदायक ठरू शकतात. काही राशींवर शनिची साडेसाती आणि ढैय्याचा अशुभ प्रभाव सुरू होईल. त्यामुळे या राशींना थोडी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण या काळात त्यांना जगाची आणि माणसांची चांगली प्रचिती येईल. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. धनहानी होऊ शकते.
या राशींवर साडेसातीचा अशुभ प्रभाव
ज्योतिष पंचांगानुसार, 13 जुलै रोजीपासून मेष राशीच्या लोकांना साडेसातीचा सामना करावा लागू शकतो. त्यांचे आयुष्य कष्टमय असेल. तर मीन राशीवर दुसरा टप्पा, कुंभ राशीवर तिसरा आणि अंतिम टप्पा असेल. या काळात या तीनही राशींना जीवनातील कडूगोड अनुभव गाठीशी येतील. या राशींना साडेसातीचा प्रतिकूल परिणाम दिसून येईल. या राशीच्या जातकांना नोकरी आणि व्यापारात अडचणींचा सामना करावा लागला. या काळात पैशांचा व्यवहार करताना जपून करा. या काळात उत्पन्नावर परिणाम दिसून येऊ शकतो. कार्यस्थळी नोकरदाराना सबुरीचा सल्ला ग्रह देत आहेत. वाहन चालवताना काळजीपूर्वक चालवा.
या राशींवर ढैय्याचा प्रभाव, आयुष्य होईल खडतर
शनि देवाच्या उलट्या चालीमुळे धनु आणि सिंह राशीवर ढैय्याचा प्रभाव दिसून येईल. त्यांचे आयुष्य कष्टमय होईल. या लोकांचे आरोग्य खराब होऊ शकते. त्यांना एखादी जुनी व्याधी सतावू शकते. या व्यक्ती मानसिक तणावात असू शकतात. या काळात गुंतवणूक सल्ल्याने आणि काळजीपूर्वकच करा. आरोग्याची काळजी घ्या. नाहक कोणाशी वाद घालवू नका. शनि, हनुमान या देवतांची आराधना करणे, नाम जप करणे या काळात फायदेशीर राहू शकते. मन शांतीसाठी ध्यान धारणा उपयोगी ठरू शकते.
डिस्क्लेमर: ज्योतिष आणि धार्मिक ग्रंथावर आधारीत माहिती, टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही. तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घ्या.