Tulsi Puja: तुळशीची पूजा करताना करा हे छोटे काम, घरात सदैव राहील लक्ष्मीचा वास

| Updated on: Sep 05, 2022 | 1:13 PM

हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावावा. असे केल्याने घरात नेहमी सुख-समृद्धी राहते.

Tulsi Puja: तुळशीची पूजा करताना करा हे छोटे काम, घरात सदैव राहील लक्ष्मीचा वास
तुलसी पूजा मंत्र
Follow us on

तुळशीला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते. याशिवाय ती देवी लक्ष्मीचे रूप देखील आहे. ज्या घरांमध्ये तुळशीची पूजा (Tulsi Puja) केली जाते तिथे माता लक्ष्मीची कृपा असते. हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावावा. असे केल्याने घरात नेहमी सुख-समृद्धी राहते. ज्योतिषशास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाशी संबंधित काही उपाय (Tulsi Upay) आणि नियम सांगण्यात आले आहेत. या उपायांनी  देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

तुळशीची पूजा करताना म्हणा हा मंत्र

ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीपूजनाच्या वेळी एखाद्या विशिष्ट मंत्राचा जप केल्यास देवी लक्ष्मी सर्व मनोकामना पूर्ण करते. तसेच, तिचा घरात कायं वास असतो. ज्या घरात तुळशीची नेहमी पूजा केली जाते तिथे कायम बरकत असते. तुलसी पूजेच्या वेळी जपला जाणारा हा प्रभावी मंत्र आहे – ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’. पूजेनंतर तुळशीमातेसमोर आसन ठेऊन या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने विशेष फायदा होतो.

समस्येतून होते मुक्तता

तुळशीपूजेदरम्यान या मंत्राचा जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते. जीवनातील सर्व संकटे दूर होतात. घरात कधीही दुःख आणि गरिबी नसते. माता लक्ष्मीची कायमच कृपा असते.  तुळशीच्या रोपाबद्दल काही काही नियम पाळणे आवश्यक आहे. आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला कधीही हात लावू नका.  रात्री किंवा रविवारी तुळशीची पाने तोडू नका. एकादशीलाही तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये, पाणी अर्पण करू नये किंवा पाने तोडू नयेत.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)