घड्याळासह या 6 वस्तू भेट देणे शक्यतो टाळा; चुकूनही त्या कोणालाही देऊ नका अन्यथा तुमचंही नुकसान होईल

वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट वस्तू भेट देणे अशुभ मानले जाते. या भेटवस्तू देण्याने देणारा आणि घेणारा दोघांवरही नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव येऊ शकतो किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि समस्या टाळण्यासाठी भेटवस्तू निवडताना वास्तु नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

घड्याळासह या 6 वस्तू भेट देणे शक्यतो टाळा; चुकूनही त्या कोणालाही देऊ नका अन्यथा तुमचंही नुकसान होईल
Vastu Shastra, 7 gifts you should never give
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 29, 2025 | 2:11 PM

वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर किती खोलवर परिणाम होतो हे जाणून नक्कीच आपल्या सर्वांनाच माहित आहे. घरातील दिशा असो किंवा पूजा असो सर्वांबाबत वास्तुशास्त्रात एक नियमावली सांगण्यात आली आहे. त्याचे अर्थ सांगण्यात आले आहेत. त्या नियमांचे पालन करून आपण आपल्या घराची ऊर्जा सकारात्मक बनवू शकतो. शिवाय त्यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, वास्तुशास्त्र केवळ घराची दिशा किंवा वस्तूंच्या योग्य स्थानापुरते मर्यादित नाही त्यात भेटवस्तू देण्याशी संबंधित महत्त्वाचे नियम देखील समाविष्ट आहेत. म्हणून, जर तुम्ही कोणाला भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर वास्तुनुसार ती योग्य वस्तू निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की काही वस्तू भेटवस्तू देणे अशुभ मानले जाते. ते फक्त समोरच्यासाठीच नाही तर स्वत:साठी देखील. तर, चला अशा काही गोष्टी जाणून घेऊया ज्या तुम्ही कधीही भेट देऊ नयेत.

या वस्तू चुकूनही भेट म्हणून देऊ नका 

तीक्ष्ण वस्तू

तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू कधीही भेट देऊ नयेत. वास्तुशास्त्रानुसार, कात्री, चाकू किंवा नेलकटर अशी कोणतीही तीक्ष्ण वस्तू भेटवस्तू देणे टाळावे.त्याचा नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होो असे मानले जाते. अशा वस्तू भेटवस्तू दिल्याने नात्यांमध्ये तणाव वाढू शकतो आणि नाते तुटण्याचा धोका वाढू शकतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

पर्स

वास्तुशास्त्रानुसार, पर्स किंवा पाकीट कधीही कोणालाही भेट देऊ नये. असे मानले जाते की पर्स भेटवस्तू दिल्याने केवळ नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण होऊ शकत नाही तर तुमच्या आर्थिक परिस्थितीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

घड्याळ

अनेजण कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर पहिली निवड ही शक्यतो घड्याळंच असते. पण घड्याळ भेटवस्तू म्हणून देणे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की घड्याळ भेटवस्तू दिल्याने तुमच्या आयुष्यात आणि ज्याला ते भेटवस्तू दिली जात आहे त्याच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. यामुळे नातेसंबंधांमध्ये अंतर येऊ शकते.

बूट आणि चप्पल

बूट किंवा चप्पल कधीही कोणालाही भेट देऊ नयेत. वास्तुशास्त्र त्या भेटवस्तू देणे अशुभ मानते. असे म्हटले जाते की अशा वस्तू भेटवस्तू दिल्याने नात्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते आणि कधीकधी विद्यमान बंध देखील तुटू शकतात. म्हणून, बूट किंवा चप्पल भेटवस्तू देणे टाळणे उचित आहे.

रुमाल

अनेक जण गिफ्ट म्हणून एखाद्याला रुमालाचा सेटही भेट देतात, मात्र वास्तुशास्त्रानुसार रुमाल हे आश्रूंचं प्रतिक मानलं जातं, यामुळे नकारात्मकता निर्माण होऊ शकते, त्यामुळे भेटीत रुमाल देऊ नका असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

मोती

मोती तसं महागडं गिफ्ट आहे, मात्र मोती देखील आश्रू, तणावाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे मोत्याचे दागिने दुसऱ्याला गिफ्ट करणे टाळलं पाहिजे.

काळ्या वस्तू

काळा रंग नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारा मानला जातो, म्हणून काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगापासून बनवलेल्या वस्तू भेट देऊ नयेत. वास्तुशास्त्रानुसार, अशा वस्तू भेटवस्तू दिल्याने जीवनात नकारात्मक बदल होऊ शकतात आणि मानसिक ताण वाढू शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)