Vastu Shastra : तुम्ही देखील करतायेत ही चूक? पडू शकते महागात, घरात येते गरिबी

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेल्या विविध वास्तुदोषांबद्दल माहिती देण्यात येते, तसेच त्यांच्या निवारणासाठी काही उपाय देखील सांगितले जातात. आपण दररोज अशा काही छोट्या -छोट्या चुका करत असतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.

Vastu Shastra : तुम्ही देखील करतायेत ही चूक? पडू शकते महागात, घरात येते गरिबी
vastu tips
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 8:45 PM

वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? घराची रचना कशी असावी? घरात कोणत्या वस्तू असाव्यात? किंवा घरात कोणत्या वस्तू नसाव्यात याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तो कसा दूर करायचा? याबद्दल देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही छोट्या -मोठ्या चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्यांच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, त्या घरातील कुटुंबप्रमुखाच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. जसं की सर्व काही सुरळीत सुरू असतना अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. व्यवसायात तोटा होतो, किंवा घरात काहीही कारण नसताना भांडणं सुरू होतात. यामुळे तु्म्हाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे अशा चुका टाळल्या पाहिजेत असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, ही चूक तर अनेक जण दररोज करतात, मात्र त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

अनेकांना केस गळतीची समस्या असते, तसेच अनेक जण केस विंचरल्यानंतर किंवा भांग पाडल्यानंतर कंगव्यात अडकलेले केस असेच इतरत्र अस्तव्यस्त पडू देतात. असे केस त्यानंतर सर्व घरभर पसरतात. मात्र ही सवय अत्यंत चुकीची आहे, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून देखील ही सवय चुकीची आहे, कारण यामुळे हे केस तुमच्या अन्नामध्ये देखील मिसळू शकतात, ते तुमच्या पोटात जाण्याचा देखील धोका असतो. त्यामुळे हे सर्व केस व्यवस्थित गोळा करून डस्बिनमध्ये टाकावेत. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात नेहमीच अशाप्रकारे केस कुठेही पडत असतील, सर्व घरभर केस होत असतील तर यामुळे राहु आणि केतू नाराज होतात. घरात राहुदोष निर्माण होतो.

शनीदोष – दरम्यान तुम्हाला देखील अशीच सवय असेल तर त्यामुळे शनी देव देखील नाराज होतात. जर एखाद्या व्यक्तीवर शनीदेव नाराज झाले तर त्यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावं. जर तुमचं घर स्वच्छ असेल तर शनी देवांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असेल असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us