Vastu Shastra : देवपूजा करताना या पाच चुका टाळाच, अन्यथा उद्ध्वस्त व्हाल

वास्तुशास्त्रानुसार देवपूजा करताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. तरच आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती होते, अन्यथा हे नियम पाळले न गेल्याचा त्याचा अशुभ परिणाम देखील घरावर होऊ शकतो.

Vastu Shastra : देवपूजा करताना या पाच चुका टाळाच, अन्यथा उद्ध्वस्त व्हाल
देवपूजा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 9:58 PM

देवपूजा करताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. जर तुम्ही हे सामान्य नियम पाळले नाहीत तर तुम्हाला इच्छित फळाची प्राप्ती होत नाही, तसेच तुमच्या कार्यात अडथळे देखील येऊ शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार देवाची पूजा करताना अनेकजण छोट्या-छोट्या चुका करतात, मात्र या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. ज्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, अशा घरात अनेक समस्या निर्माण होतात. चलातर मग जाणून घेऊयात देवपूजा करताना कोणत्या चुका या टाळल्या पाहिजेत, अन् त्याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं?

स्वच्छता – देवपूजेपूर्वी तुमचं घर हे स्वच्छ झाडून घेतलेलं असावं, कुठेही कचरा असू नये, तसेच तुमच्या देवघराचा परिसर देखील स्वच्छ असावा, देवघराच्या परिसरात कुठेही जाळे वगैरे लागलेले किंवा पसरा असू नये. नेहमी स्वच्छ वातावरणातच पूजा करावी असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. कधीही घर अस्वच्छ असताना देवपूजा करू नये.

Loading...

आसन – वास्तुशास्त्रानुसार देवपूजा करताना कधीच जमिनीवर बसू नये, देवपूजा करताना नेहमी आसनावरच बसावं.

देवघरात कधीही एकाच देवतेच्या दोन दोन मूर्ती असू नये, जसं की दोन गणपती, दोन बालाजी दोन रंगनात किंवा इतर कोणत्याही देवतेच्या दोन मूर्ती असू नये. नेहमी एका देवतेची एकच मूर्ती असावी. तसेच देवघरात कधीही उजव्या सोंडेचा गणपती असू नये, देवघरात नेहमी डाव्या सोंडेंचाच गणपती असावा, तसेच देवघरात कधीही शनि देवाची मूर्ती असू नये,असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

देवपूजा करताना कधीही देवतांचं स्थान बदलू नये, पूर्वी जिथे देव ठेवले आहेत, तिथेच ते पूजेनंतर पुन्हा ठेवावेत, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

तसेच कधीही महादेवाना फूल अर्पण कराना लाल फूल अर्पण करू नये, किंवा तुळशीची पानं देखील अर्पण करू नये, शिवलिंगावर नेहमी पांढरी फुलंच अर्पण करावीत असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us