Vastu Shastra : दिवाळीपूर्वी हा एक उपाय कराच, सर्व नकारात्मक ऊर्जा होईल दूर, घरात येईल सुख, समृद्धी

आता दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. पाच नोव्हेंबर रोजी दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा उत्सव असतो, या काळात धन प्राप्तीसाठी देखील काही उपाय केले जातात. आज आपण अशाच एका उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे?

Vastu Shastra : दिवाळीपूर्वी हा एक उपाय कराच, सर्व नकारात्मक ऊर्जा होईल दूर, घरात येईल सुख, समृद्धी
vastu shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 8:44 PM

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्व आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जा कमी होऊन, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, तेव्हा संबंधित व्यक्तीच्या आयुष्यात विविध अडचणी येऊ शकतात. त्यामुळे घरातील सर्व दोष दूर होऊन, घरात सुख, शांती आणि समृद्धी यावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आता अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली आहे. दिवाळी हा हिंदू धर्मामधील सर्वात मोठा सण असतो. दिवाळी हा दिव्याचा, आनंदाचा उत्सव असतो. वास्तुशास्त्रानुसार दिवाळी सुरू होण्यापूर्वी काही विशिष्ट उपाय केल्यास, त्यामुळे घरात सुख, समृद्धी येते. घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते. वास्तुशास्त्रानुसार दिवाळी सुरू होण्यापूर्वी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ हिरव्या रंगाचं पायपुसणं ठेवलं पाहिजे. हिरव्या रंगाला वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं, त्यामागे विविध कारणं देखील आहेत, आज आपण अशाच काही कारणांबद्दल जाणून घेणार आहोत.

आपण जेव्हा एखाद्या कामानिमित्ताने घराच्या बाहेर पडतो, तेव्हा आपण आपल्यासोबत विविध प्रकारची ऊर्जा घेऊन येत असतो. अशी नकारात्मक ऊर्जा घराच्या मुख्य दरवाजातच नष्ट करण्याचं काम ही हिरव्या रंगाची पायपुसणी करते, हिरवा रंगा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं कम करतो, त्यामुळे तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही. नकारात्मक ऊर्जा ही नेहमी घरापासून दूर राहते, त्यामुळे घरात मुख्य दरवाजाजवळ नेहमी हिरव्या रंगाचं पायपुसणं ठेवावं, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे, तसेच ही पायपुसणी महिन्या-दोन महिन्यातून एकदा बदलावी, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. घराच्या मुख्य दरवाजाजवळ पायपुसणी ठेवताना नेहमी एक काळजी घ्यावी ती म्हणजे ही पायपुसणी कधीही काळ्या रंगाची असू नये, असंही वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

Loading...

पुर्वीच्या काळी जेव्हा एखादा पाहुणा आपल्या घरी यायचा, तेव्हा तो सगळ्यात आधी घराच्या बाहेर हात पाय धुवायचा आणि मगच घरात प्रवेश करायचा. या मागे केवळ स्वच्छता हेच कारण नाही, तर बाहेरून आलेली नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू नये, यासाठी देखील ही काळजी घेतली जाते, त्याच प्रमाणे या पायपुसणीचं देखील असंच आहे, त्यामुळेच ही पायपुसणी घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us